YouTube ची दिवाळी ऑफर! फक्त 10 रुपयांमध्ये 3 महिन्यांसाठी मिळवा...,पाहा डिटेल्स

YouTube Subscription Offer: येत्या काही दिवसांवर दिवाळीचा सण येवुन ठेपला आहे. याचपार्श्वभूमीवर भेटवस्तू आणि ऑफरचा पाऊस सुरू झाला आहे. प्रत्येक कंपनी नवनवीन ऑफर्स देत आहे. अशा परिस्थितीत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म YouTube देखील आपल्या वापरकर्त्यांना प्रीमियम सबस्क्रिप्शनसाठी मोठ्या सवलतीची संधी देत ​​आहे.

Updated: Oct 10, 2022, 03:30 PM IST
YouTube ची दिवाळी ऑफर! फक्त 10 रुपयांमध्ये 3 महिन्यांसाठी मिळवा...,पाहा डिटेल्स  title=

YouTube Premium Account : यूट्यूबवर मनोरंजनाची सर्वात मोठी अडचण आहे ती मध्येच येणाऱ्या जाहिराती. जाहिरात काढायची असेल तर प्रीमियम सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करावे लागतो. याचपार्श्वभूमीवर YouTube ने दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या वापरकर्त्यांसाठी एक धमाकेदार ऑफर आणली आहे. ज्याद्वारे तुम्ही फक्त 10 रुपयांमध्ये जाहिरातमुक्त व्हिडिओ स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता आणि तेही तीन महिन्यांसाठी असणार आहे. (enjoy ad free video streaming on youtube in 10 rupees youtube premium account diwali offer)

ऑफर कोणासाठी आहे

YouTube ने प्रीमियम अकाऊंट सबस्क्रिप्शनमध्ये (Subscription) प्रचंड सूट देणारी ही ऑफर फक्त भारतीयांसाठी आणली आहे. ऐरवी YouTube प्रीमियमची सदस्यता घेण्यासाठी दरमहा 129 रुपये खर्च करावे लागतात. यानुसार पाहिल्यास तीन महिन्यांत एकूण 393 रुपये खर्च होतात. परंतु यूट्यूबच्या या ऑफरद्वारे तुम्ही केवळ 10 रुपयांमध्ये या सुविधेचा लाभ घेऊ शकता.

फायदा कसा घ्यावा

तुमच्या YouTube खात्यावर जाऊन तुम्हाला Get Premium च्या पर्यायावर जावे लागेल. ऑनलाइन पेमेंट करून तुम्ही या नवीन ऑफरचा आनंद घेऊ शकता.

वाचा : क्रिकेटपासून दुरावतोय धोनी? सध्या जे काम करतोय ते पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न

ऑफरचे फायदे

- ऑक्टोबर-नोव्हेंबर महिना सणांनी भरलेला असतो. अशा वेळी तुम्ही YouTube चे स्वस्त सदस्यत्व घेऊन जाहिरातमुक्त व्हिडीओ बघू शकता. 

- तुम्ही YouTube चे जाहिरातमुक्त व्हिडिओ नंतरसाठी जतन करू शकता.

- तुम्ही डेस्कटॉपवरही या जाहिरातमुक्त सेवेचा लाभ घेऊ शकता. म्हणजेच सणांच्या काळात तुम्ही संपूर्ण कुटुंबासह घरबसल्या YouTube वर टॉकीजचा आनंद घेऊ शकता.

- ऑफरचा लाभ दीर्घ काळासाठी आहे. जर तुम्हाला दिवाळीत वेळेच्या कमतरतेबद्दल काळजी वाटत असेल तर तुम्ही आत्ताच सदस्यता घेऊन या ऑफरचा आनंद घेऊ शकता.