Maruti Dzire साठी इलेक्ट्रिक कीट लॉन्च, इतकी आहे किंमत

इलेक्ट्रीक वाहने लॉन्च होण्याचा सिलसिला कायम आहे. पण यामध्ये काही मोजक्याच कंपन्या उतरत आहेत.

Updated: Aug 23, 2021, 05:28 PM IST
Maruti Dzire साठी इलेक्ट्रिक कीट लॉन्च, इतकी आहे किंमत title=

Electric Kit For Maruti Dzire: इलेक्ट्रीक वाहने लॉन्च होण्याचा सिलसिला कायम आहे. पण यामध्ये काही मोजक्याच कंपन्या उतरत आहेत. जे लोकं पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी गाड्या वापरत आहेत. त्यांना त्यांची गाडी इलेक्ट्रिक मध्ये नेण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. पण पुण्यातीसल नॉर्थवे मोटरस्पोर्टने पॅसेंजर आणि कमर्शियल दोन्ही वाहनांसाठीठी इलेक्ट्रिक किट लॉन्च केले आहे.

कंपनीने म्हटलं की, मारुती डिजायर ईवी किट एक प्लग अँड प्ले किट आहे. या किटचा प्रयोग करण्यासाठी पेट्रोल इंजिन शिवाय काहीही हलवण्याची गरज नाही. हा पेट्रोल इंजिन प्रमाणेच माउंटिंग पॉइंटवर चालेल. डिजायरसाठी कंपनीने दोन ईवी किट ड्राइव ईजेड आणि ट्रैवल ईजेड लॉन्च केले आहे. ज्याची रेंज क्रमशः 120 किमी आणि 250 किमी ठरवण्यात आली आहे.

Drive EZ ला 5-6 तास चार्जिंग वेळ लागतो. तर Travel EZ साठी चार्जिंग टाइम 8-10 तास रेट केला गेला आहे. ड्राइव ईजेड रेंजसाठी मारुती डिजायर इलेक्ट्रिक कन्वर्जन किटची बुकिंग 25,000 रुपयाच्या टोकनने सुरु करण्यात आली आहे. तर Travel EZ रेंजसाठी बुकिंग लवकरच सुरु करण्यात येणार आहे. स्पीडबद्दल बोलायचं झालं तर क​मर्शियल वाहनांना टॉप स्पीड 80 किमी प्रति तास आणि खासगी उपयोगासाठी 140 किमी प्रति तास ठेवण्यात आली आहे.

नॉर्थवे मोटरस्पोर्टने मारुती डिजायर आणि टाटा ऐस साठी दोन किट लॉन्च केल्या आहेत. Ace ची बॅटरी पॅक किंवा इलेक्ट्रिक मोटरबाबत कोणतंही विशेष तपशील नाही. रण ईवी कन्वर्जन किट 80-100 किमीपर्यंत रेंज देऊ शकते.

नॉर्थवे मोटरस्पोर्टने चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चरसोबत संपूर्ण भारतात सर्विस पॉइंट स्थापन करण्यासाठी भारतीय ईवी किंवा बीईवी सोबत करार केला आहे. पहिल्या टप्प्यात कंपनीचं लक्ष्य संपूर्ण महाराष्ट्रात डीलर आणि चार्जिंग नेटवर्क स्थापित करण्याचा आहे. जो 3 ते 7 महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे.