२२ हजारांचा स्मार्टफोन केवळ २६०० रुपयांमध्ये होणार उपलब्ध

२२ हजारांचा स्मार्टफोन चक्क २६०० रूपयामध्ये मिळत आहे. हे ऐकून तुम्हांला ही फसवणूक वाटू शकते. पण इबे वर सुरू असलेल्या सेलमध्ये १०० % ओरिजन आणि क्वॉलिटी टेस्टेड असेल तर खास ऑफर मिळणार आहेत असा इबेने दावा केला आहे. 

Updated: Nov 20, 2017, 01:20 PM IST
२२ हजारांचा स्मार्टफोन केवळ २६०० रुपयांमध्ये होणार उपलब्ध  title=

मुंबई : २२ हजारांचा स्मार्टफोन चक्क २६०० रूपयामध्ये मिळत आहे. हे ऐकून तुम्हांला ही फसवणूक वाटू शकते. पण इबे वर सुरू असलेल्या सेलमध्ये १०० % ओरिजन आणि क्वॉलिटी टेस्टेड असेल तर खास ऑफर मिळणार आहेत असा इबेने दावा केला आहे. 

इबेच्या रिफर्बिश्ड स्मार्टफोन सेलमध्ये नोकिया, ब्लॅकबेरी, इंटेक्स, सॅमसंग अशा अनेक अग्रगण्य कंपनींचे स्मार्टफोन उपलब्ध होणार आहेत. 

२२हजारांचा फोन २६०० रुपयांमध्ये 

नोकिया ल्युमिया ७२० हा सुमारे २२ हजारांचा फोन सेलमध्ये २६२९ रूपयांमध्ये मिळणार आहे. तर सोनीचा एक्सपिरिया ई ड्युएल हा फोन १३१९९ रूपयां चा फोन २१९९ मध्ये मध्ये उपलब्ध होणार आहे. 
अशाप्रकारे अनेक ब्रॅन्डवर ८५ % सूट देण्यात आली आहे. 

Samsung Galaxy E7 

इबेच्या सेलवर हा फोन ४७९९ रूपयांमध्ये मिळणार आहे. या फोनमध्ये 2GB रॅम आणि  16GB इंटरनल स्टोरेज आहे. तसेच डिवाईसमध्ये १३ एमपीचा प्रायमरी कॅमेरा तर ५ एमपीचा सेकेंडरी कॅमेरा आहे. 

Oneplus 3T 

या फोनची रॅम ६ जीबी आणि इंटरनेल मेमरी ६४ जीबी आहे. या फोनचा कॅमेराही उत्तम आहे. १६ एमपीचा प्रायमरी कॅमेरा तर १६ एमपीचा सेकेंडरी कॅमेरा आहे. 

Samsung Galaxy Note 3 

रीफर्बिश्ड स्मार्टफोन सेलमध्ये हा फोन ९८९९ रूपयांमध्ये उपलब्ध आहे. या फोनची रॅम ३ जीबी आहे तर इंटरनल ३२ जीबी आहे. यामधील प्रायमरी कॅमेरा १३ एमपी आहे. 

Mi 5 रीफर्बिश्ड स्मार्टफोन  

या फोनमध्ये ४जी डिवाईस आणि ३ जीबी रॅम आहे. सोबतच ३२ जीबी स्टोरेज आहे. या डिव्हाईसला ५.१५ इंचाचा डिस्पे आहे. तसेच १३ एमपी प्रायमरी कॅमेरादेखील देण्यात आला आहे.