Traffic पोलिसांना तुमच्या गाडीची चावी काढण्याचा अधिकार आहे का? जाणून घ्या 5 नियम

पोलिसांच्या गैरवर्तनाची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे चालक म्हणून आपले हक्क जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

Updated: Sep 14, 2022, 12:45 PM IST
Traffic पोलिसांना तुमच्या गाडीची चावी काढण्याचा अधिकार आहे का? जाणून घ्या 5 नियम title=

Traffic Rules Must Know: रस्त्यावर वाहनं चालवताना प्रत्येक जण काळजी घेतो. गाडीची कागदपत्रं आणि वाहन चालवण्याचा परवाना जवळ असतो. मात्र इतकं असूनही वाहतूक पोलिसांना पाहिलं की, वेगळ्याच भावना मनात येतात. अनेकदा वाहतूक पोलीस कागदपत्रं तपासण्यासाठी गाडी अडवतात. जर आपण नियमांचे पालन करत असू तर आपल्याला घाबरण्याची गरज नाही. पण असं असलं तरी पोलिसांच्या गैरवर्तनाची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे चालक म्हणून आपले हक्क जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आज तुम्हाला वाहतुकीसंबंधात महत्त्वाचे नियम सांगणार आहोत.

गाडी चालवताना ही कागदपत्रे जवळ ठेवा

  • Registration certificate (RC)
  • Pollution under control (PUC)
  • Insurance document
  • Driving licence

पुढील नियम कायम लक्षात ठेवा

1. पोलिस अधिकारी नेहमी त्याच्या गणवेशात असावा आणि जर गणवेशात नसेल तर तुम्ही ओळखपत्र मागू शकता. जर त्याने ओळखपत्र दाखवले नाही, तर तुम्ही तुमची कागदपत्रे दाखवण्यासही नकार देऊ शकता.

2. तुमच्या परवानगीशिवाय पोलीस अधिकारी तुमच्या कारच्या चावी काढू शकत नाहीत.

3. जर तुम्ही वाहनाच्या आत बसला असाल तर पोलिस तुमचे वाहन टो करू शकत नाहीत.

4. जर तुम्हाला दंड केला असेल तर तो अधिकृत पावती पुस्तक किंवा ई-चलान मशीनमधून आला पाहिजे. जर अशी कोणतीही पावती नसेल तर तुम्ही फक्त लाच देत आहात, असं समजा.

5. ट्रॅफिक पोलिसांनी तुमची कोणतीही कागदपत्रे जप्त करण्याचा निर्णय घेतल्यास पावती मागा.