Gadgets News : DSLR कॅमेराला कोणता फोन देतो टक्कर... जाणून घ्या

जर तुम्ही प्रोफेशनल यूट्यूबर म्हणून तयारी करत असाल आणि तुमच्याजवळ  प्रोफेशनल कॅमेरा खरेदी करण्यासाठीचे बजेट नसेल तर तुम्हाला त्रास करुन घ्यायची गरज नाही.

Updated: Sep 13, 2022, 06:36 PM IST
Gadgets News : DSLR कॅमेराला कोणता फोन देतो टक्कर... जाणून घ्या title=

Why iPhones are best for photography: कोरोनाकाळात बऱ्याच लोकांनी कॅमेऱ्याला मित्र बनवले. त्यांच्या आयुष्यात चालणाऱ्या प्रत्येक घडामोडी किंवा छंद कॅमेऱ्यात टिपून लोकांसमोर सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर ठेवायचे. काही जणांना लोकांसमोर सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वत:ला प्रेंझेट करणे चांगलेच जमले. मग त्यांनी याचे रुपांतर करिअर मध्ये केले. जर तुम्ही प्रोफेशनल यूट्यूबर म्हणून तयारी करत असाल आणि तुमच्याजवळ  प्रोफेशनल कॅमेरा खरेदी करण्यासाठीचे बजेट नसेल तर तुम्हाला त्रास करुन घ्यायची गरज नाही. तुम्ही आयफोनलाच (iPhone) प्रोफेशनल कॅमेरा म्हणून वापरु शकता. यामागे बरीच कारणे आहेत. लाखो यूट्यूबर्स आयफोनच्या मदतीने व्हिडीओ तयार करतात आणि त्यातून लाखो रुपयांची कमाई करतात. जर तुम्हाला या विषयाची माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला या बातमीत आयफोन (iPhone) व्हिडीओ तयार करण्यासाठी योग्य ऑप्शन कसं आहे हे सांगणार आहोत.

या कारणांमुळे व्हिडीओ तयार करण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आयफोन (iPhone).

धूळ, ढगाळ किंवा पावसाळी वातावरणातही तुम्ही आयफोनच्या (iPhone) सहाय्याने फोटो काढु शकतात.

वापरण्यास सोपा, सुलभ आणि पोर्टेबल असल्यामुळे चालता फिरता आयफोनचा (iPhone) वापर करु शकता.

पैनोरमा, स्लो मोशन, टाइम लैप्स, लाइव फोटो और पोर्ट्रेट मोड सगळ्या सुविधांचा वापर करणे सोपं आहे.

हलका - भारी कॅमेरा आणि एकापेक्षा अधिक लेन्स सोबत ठेवायची गरज नाही कारण आयफोनमध्ये (iPhone) झूम इन आणि झूम आऊट करण्याची सुविधा आहे

लाइट कैप्चरिंग सेंसर-  आयफोनमध्ये (iPhone) लाइट कैप्चरिंग सेंसर आहे ज्यामुळे व्हिडीओ स्पष्ट आणि चांगल्या क्वॉलिटीमध्ये येतात.

आयफोनमध्ये (iPhone) 4K 10-बिट HDR सेल फोन व्हिडीओ रिकॉर्ड करण्याची क्षमता मिळते.

आयफोनमध्ये (iPhone) व्हिडीओ फाईलची साईज कमी असते अशामुळे जास्तीचा स्पेस मिळतो.

DSLR च्या तुलनेत आयफोनची किंमत बऱ्यापैकी कमी असते. आणि तुम्हाला लेन्स देखील खरेदी करावी लागत नाही.

जर तुमच्या बजेटमध्ये आयफोन आयफोनमध्ये (iPhone) नसेल बसत  तर सेकेंड हैण्ड आयफोन आयफोनमध्ये (iPhone) घेऊन सुद्धा व्हिडीओ बनवायला सुरुवात करु शकता यामुळे तुमचे काम देखील सोपे होईल आणि तुम्हाला जास्त पैसे देखील खर्च करायची गरज नाही.  

जर वेळ आणि पैसे वाचवायचे असतील तर आयफोन आयफोनमध्ये (iPhone) हा बेस्ट ऑप्शन आहे.