मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून समाजमाध्यमांवर सायबर चोरट्यांचा धुमाकूळ वाढला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून सायबर चोर तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करीत असतात.
असाच काहीसा प्रकार फेसबुक वापरकर्त्यांसोबत घडला आहे. अनेक फेसबुक वापरकर्त्यांना त्यांच्या मित्र यादीतील मित्रांकडून एक लिक ओपन करण्याचा मॅसेज इनबॉक्समध्ये आल्याचे दिसून येत आहे.
ही लिंक ओपन केल्यास त्या फेसबुक वापरकर्त्यांकडून इतर मित्रांना मॅसेज जात आहेत. हा व्हायरस असल्याचे अनेक वापरकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या कोणत्याही लिंकवर क्लिकवर करू नका. असे सायबर तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे..
या लिंकच्या माध्यमातून डेटा चोरी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अधिक काही फसवणूक होण्याआधी फेसबुकचे पासवर्ड बदला. तुम्ही वापरत असलेल्या उपकरणाव्यतिरिक्त इतर सर्व उपकरणांवर लॉग इन झाले असल्यास, त्या सर्व ठिकाणांहून लॉग आऊट करा... तसेच फेसबुक अकाऊंट सेक्युरिटी तपासून घ्या.