दिवाळीनिमित्त ह्युंदाई कारच्या खरेदीवर बंपर ऑफर्स

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर जर कार घेण्याचा विचार करत असाल तर कंपन्या वेगवेगळ्या ऑफर्स देत आहे. देशातील दुसरी मोठी कार कंपनी ह्युंदाई आपल्या काही कार्सवर जबरदस्त ऑफर देत आहे.  

Updated: Oct 19, 2017, 11:32 AM IST
दिवाळीनिमित्त ह्युंदाई कारच्या खरेदीवर बंपर ऑफर्स title=

नवी दिल्ली : दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर जर कार घेण्याचा विचार करत असाल तर कंपन्या वेगवेगळ्या ऑफर्स देत आहे. देशातील दुसरी मोठी कार कंपनी ह्युंदाई आपल्या काही कार्सवर जबरदस्त ऑफर देत आहे.  

१) ह्युंदाई इऑन -

ह्युंदई आपल्या लहान आणि सर्वात लोकप्रिय कारवर दिवाळी निमित्त ६०० हजार रूपयांचा डिस्काऊंट देत आहे. हे ह्युंदाईची सर्वात लहान आणि अ‍ॅफोर्डेबल कार आहे. ऑफर्समध्ये कॅश डिस्काऊंट, एक्सचेंज बोनस आणि सरकारी कर्मचा-यांना स्पेशल ऑफरचा समावेश आहे. भारतात या कारची सुरूवातीची किंमत २.६९ लाख रूपये इतकी आहे. 

२) ह्युंदाई ग्रॅन्ड आय१०

ह्युंदाई ग्रॅन्ड आय१० ची सुरवातीची किंमत ४.२९ लाख रूपये इतकी आहे. ही कार २०१३ मध्ये लॉन्च करण्यात आली होती. ह्युदाईच्या या कारच्या पेट्रोल मॉडेलव ग्राहकांना ८० हजारांचा आणि डिझल इंजिन मॉडेलवर ९० हजार रूपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे. 

३) ह्युंदाई एक्सेंट 

ही ह्युंदाईची सबकॉम्पॅक्ट सिडेन कार आहे. या कारच्या खरेदीवर तुम्हाला ५० हजार रूपयांचा फायदा होऊ शकतो. ही ऑफर पेट्रोल आणि डिझेल दोन्ही व्हेरिएंटवर उपलब्ध आहे. ऑफर्समध्ये कॅश डिस्काऊंट आणि एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. 

४) ह्युंदाई आय२० आणि आय२० अ‍ॅक्टीव्ह

जर तुम्ही ह्युंदाईची आय२० किंवा आय२० अ‍ॅक्टीव्ह ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यावर तुमची २५ हजारांची बचत होऊ शकते. कॅश डिस्काऊंट, एक्सचेंज ऑफर्ससोबतच ह्युंदाई कार खरेदीवर कार्पोरेट डिस्काऊंट, एक्सटेंडेट वॉरन्टी सुद्धा दिली जात आहे. या ऑफर्स ऑक्टोबरच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सुरू असतील.