BSNL चा 200 रुपयांपेक्षा कमी किमतीचा जबरदस्त प्लान! खूप सारे फायदे जाणून घ्या

BSNL Cheapest Prepaid Plan : भारत सरकारची BSNL कंपनी आपल्या यूसर्ससाठी एक स्वस्त प्लान लॉन्च केला आहे. त्यामुळे जिओ आणि एअरटेल या खासगी कंपन्यांचे टेन्शन वाढले आहे. 

Updated: Aug 23, 2022, 08:09 AM IST

BSNL का 200 रुपये से कम कीमत वाला गजब Plan! महीने भर तक रोज 2GB डेटा; Benefits जानकर तुरंत करा लेंगे रिचार्ज

नवी दिल्ली : BSNL Cheapest Prepaid Plan : भारत सरकारची BSNL कंपनी आपल्या यूसर्ससाठी एक स्वस्त प्लान लॉन्च केला आहे. त्यामुळे जिओ आणि एअरटेल या खासगी कंपन्यांचे टेन्शन वाढले आहे. आता  BSNL 28 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा देत आहे आणि तोही 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत.

BSNL कडे 200 रुपयांखालील सर्वोत्तम 2GB दैनिक डेटा प्रीपेड प्लान आहे. इतर प्रत्येक टेलिकॉम ऑपरेटर (खासगी कंपन्या) आपला 2GB दैनंदिन डेटा प्रीपेड प्लान खूप महाग किंमतीत ऑफर करतात, परंतु BSNL यूसर्ससाठी अतिशय स्वस्त किंमतीत अधिक डेटा प्रदान करत आहे. तुम्ही परवडणारा 2GB डेटा प्रीपेड प्लान शोधत असाल, तर तुम्ही BSNL च्या प्लान्सवर नक्कीच नजर टाकू शकता. 

BSNL 187 रुपयांचा प्रीपेड प्लान

BSNL ग्राहकांना 187 रुपयांचा प्लान देत आहे. या प्लानची खासियत म्हणजे यामध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा मिळतो. त्याची वैधता 28 दिवसांची आहे, कारण हा लो-एंड प्लान आहे. 

BSNLच्या या प्रीपेड प्लानचे फायदे

BSNL च्या 187 रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळतो, त्यानंतर स्पीड कमी होतो; यूजर्सना कंपनीकडून अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 100 SMS/दिवसाची सुविधा देखील मिळते. बीएसएनएल ट्यून्सचे एक बंडल देखील आहे आणि ते सर्व यूजर्सना 28 दिवसांसाठी मोफत उपलब्ध आहेत.

BSNL वरून आजच तुम्ही 28 दिवसांच्या इतर अनेक योजना खरेदी करु शकता. खासगी दूरसंचार कंपन्या 28 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा प्रीपेड योजना ऑफर करतात, परंतु या योजनांची किंमत जास्त असेल. त्यामुळे तुमची निवड काळजीपूर्वक करा.