BSNLकडून सर्वात स्वस्त प्लॅन लॉंच; फायदे इतके की Jio-Airtel युजर्सही हैराण

BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी फक्त 19 रुपयांचा भन्नाट प्लॅन लॉंच केला आहे. 

Updated: Jul 25, 2022, 11:38 AM IST
BSNLकडून सर्वात स्वस्त प्लॅन लॉंच; फायदे इतके की Jio-Airtel युजर्सही हैराण title=

मुंबई : जिओ, एअरटेल आणि VI आपल्या ग्राहकांसाठी अनेक फायदेशीर प्लॅन सादर करीत असतात. आता BSNLने देखील आपल्या ग्राहकांच्या फायद्याचे प्लॅन सादर केले आहेत.

BSNL 19 Prepaid Plan

बीएसएनएलचा हा प्लॅन खूप लोकप्रिय आहे, त्याची सर्वाधिक विक्री होते. या प्लॅनमध्ये संपूर्ण महिन्यासाठी 200 मिनिटे उपलब्ध आहेत. तुम्ही स्थानिक आणि राष्ट्रीय कॉलिंग करू शकता. एवढेच नाही तर प्लॅनमध्ये 2GB डेटा देखील मिळतो. कॉलिंग आणि डेटासाठी हा प्लान सर्वोत्तम आहे. परंतु या प्लॅनमध्ये SMS फायदे उपलब्ध नाहीत.

BSNL 147 Prepaid Plan

हा प्लॅनही संपूर्ण महिन्यासाठी येतो. प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि डेटा देखील उपलब्ध आहे. या प्लॅनची ​​वैधता 30 दिवसांची आहे आणि एकूण 10GB डेटा उपलब्ध आहे. यामध्ये मोफत बीएसएनएल ट्यून देखील उपलब्ध आहे.