रिलायन्स जिओनंतर BSNLची शानदार ऑफर

या ऑफरचा फायदा बीएसएनएलच्या प्रत्येक ग्राहकाला मिळणार आहे

Updated: Mar 12, 2019, 03:42 PM IST
रिलायन्स जिओनंतर BSNLची शानदार ऑफर  title=

नवी दिल्ली : तुम्हीही बीएसएनएल (BSNL) वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. रिलायन्स जिओ  (Reliance Jio) नंतर आता बीएसएनएलही टेलिकॉम मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहे. आपले ग्राहक वाढविण्याच्या प्रयत्नात असलेल्या बीएसएनएलनं जिओच्याच मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीकडून सुरू करण्यात येणाऱ्या या ऑफर्सचा फायदा नव्या आणि जुन्या अशा दोन्ही ग्राहकांना घेता येईल. बीएसएनएलनं डिसेंबरमध्ये आपल्या नव्या आणि जुन्या लॅन्डलाईन, ब्रॉडबँड आणि ब्रॉडबँड वायफाय ग्राहकांसाठी कॅशबॅक ऑफर सुरू केली होती. या ऑफरची व्हॅलिडिटी २१ डिसेंबरपर्यंत होती. आता ही ऑफर ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आलीय. 

बीएसएनएलच्या या कॅशबॅक ऑफरमध्ये जी रक्कम मिळेल, ती ग्राहकांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करण्यात येते. या रक्कमेचा वापर ग्राहकांना पुढच्या रिचार्जसाठीही करता येतो. 

कंपनीच्या ट्विटर हॅन्डलवरून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या ऑफरचा फायदा बीएसएनएलच्या प्रत्येक ग्राहकाला मिळणार आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना २५ टक्के रक्कम परत मिळते.

असं करा सबस्क्राईब

कंपनीच्या ऑफरच्या माहितीच्या स्पेसवर जेव्हा ग्राहक Agree बटन क्लिक करतील तेव्हा एक नवी विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये आपला सबस्क्राईबर आयडी तुम्हाला द्यावा लागेल. हा आयडी म्हणजे युझरचा लॅन्डलाईन किंवा फायबर टू द होम ब्रॉडबँड कनेक्शन नंबर असेल. यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी (वन टाईम पासवर्ड) मिळेल. 

ओटीपी मिळाल्यानंतर तुम्हाला इतर माहिती आणि प्रक्रिया दिसते. तुम्हाला कॅशबॅक प्लानसाठी सबस्क्राईब करण्याची इच्छा असेल तर तुम्ही सबमिट बटनावर क्लिक करू शकतात. ही ऑफर संपूर्ण देशभर लागू आहे.