पाहा, 'रिव्हर्स गिअर'सहीत BMWची 'फ्युचर स्कुटर'

बीएमडब्ल्यू मोटर्राडनं शुक्रवारी एक आधुनिक फिचर्ससहीत स्कुटर लॉन्च केलीय. यामध्ये असलेला रिव्हर्स गिअर हे या स्कुटरचं आणखी एक वैशिष्ट्यं... 

Updated: May 27, 2017, 01:59 PM IST
पाहा, 'रिव्हर्स गिअर'सहीत BMWची 'फ्युचर स्कुटर' title=

मुंबई : बीएमडब्ल्यू मोटर्राडनं शुक्रवारी एक आधुनिक फिचर्ससहीत स्कुटर लॉन्च केलीय. यामध्ये असलेला रिव्हर्स गिअर हे या स्कुटरचं आणखी एक वैशिष्ट्यं... 

या टू व्हिलरची आकर्षक डिझाईन त्याकडे सहजच ग्राहकांचं लक्ष वेधून घेण्यास आकर्षक ठरतेय. सोबतच या स्कुटरमध्ये डिजिटल कनेक्टिव्हिटीही देण्यात आलीय.  

बीएमडब्ल्यू मोटर्राड कॉन्सेप्ट लिंक स्कुटर दोन रंगांच्या कलर डिझाईनसोबत दिसतेय. यामध्ये दोन आयकॉनिक LEC फ्रंट लाईटसही आहेत.

या स्कुटरचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे यात देण्यात आलेलं अॅडजस्टेबल सीट... सोबतच स्टोअरेजसाठी लगेज कंपार्टमेन्टही देण्यात आलंय. स्पीड, नेव्हिगेशन आणि बॅटरी संबंधित माहिती समोर दिसते. इतर माहितीसाठी वेगळं पॅनल दिलं गेलंय. हे टच सेन्सिटिव्ह आहे... त्यामुळे इन्फोटन्मेंट, कनेक्टिव्हिटी आणि रुटिंग इन्फॉर्मेशन कंट्रोल केलं जाऊ शकतं.