विनाकामाच्या ई मेल्सने हैराण आहात ? असे करा बंद

नकली ई मेल्सने केवळ आपल्या इनबॉक्सच भरतो असे नाही तर खूप नुकसान होऊ शकते.

Updated: Jan 1, 2018, 01:20 PM IST
 विनाकामाच्या ई मेल्सने हैराण आहात ? असे करा बंद  title=

मुंबई : वेबसाईटवरील जाहिराती, ट्विटर्सवरील ट्रोल, मोबाईल कॉल्स, मसेज, फेसबुक नोटीफिकेशन्सनी जीमेलची मेमरी भरून जाते. 

यातील अनेक ई मेल्स हे हानी पोहोचविणारे असतात.  तर फिशिंग किंवा इतर हॅकर्सचेही अनेक ईमेल्स येत असतात. इंटरनेटला लागलेला हा कलंक म्हणता येईल. 

तरीही येतात ईमेल्स

नकली ईमेल्सने केवळ आपल्या इनबॉक्सच भरतो असे नाही तर खूप नुकसान होऊ शकते. ईमेल सर्व्हिस अनसबस्क्राइब केल्यानंतरही बऱ्याच वेबसाईट्सकडून ई मेल्स येत राहतात. 

हे टाळण्यासाठी, जीमेलने अशी प्रणाली बनविली आहे की पसंत नसलेले ई मेल्स ब्लॉक करू शकता.

१) लॉग इन करा 

 गुगलवर वर आपल्या ई मेल आयडी पासवर्डसह लॉग इन करा.

२) सर्च करा

ज्या कोणाला जीमेलवरून ब्लॉक करायचे त्याला ब्लॉक करण्यासाठी आधी सर्च करा. 

३)क्लिक करा

ई मेल उघडा,प्रेषकाच्या नाव / पत्त्याच्या खाली दिसणाऱ्या चिन्हावर क्लिक करा.

४)ब्लॉक करा 

येथून blocked Sender's name/address हा पर्याय निवडा.

अशा प्रकारे आवडत नसलेले ई मेल्स तुम्ही रोखून सुरक्षित राहू शकता.