15 हजारांपर्यंतचे भन्नाट Laptops! अगदी Touchscreen Display असणारे Laptops ही उपलब्ध

Best Laptops under 15000 in India: हल्ली केवळ कामावर जाणाऱ्यांना म्हणजेच वर्किंग प्रोफेशनल्सलाच लॅपटॉप आवश्यक असतो असं नाही तर विद्यार्थ्यांनाही अनेक प्रोजेक्टसाठी लॅपटॉपची आवश्यकता असते. मात्र विद्यार्थी लॅपटॉप विकत घेताना प्राइज फॅक्टर फार महत्त्वाचा ठरतो. त्यामुळेच पाहूयात 15 हजारांखालील काही खास लॅपटॉप्सबद्दल...

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 12, 2023, 06:23 PM IST
15 हजारांपर्यंतचे भन्नाट Laptops! अगदी Touchscreen Display असणारे Laptops ही उपलब्ध title=
अर्ध्याहून कमी किंमतीत हे 3 लॅपटॉप उपलब्ध आहेत

Best Laptops under 15000 in India: लॅपटॉप ही गोष्ट आजकाल जवळजवळ सर्व वर्कींग प्रोफेश्नलकडे असते. खरं म्हणजे लॅपटॉप ही काळाजी गरज झाली आहे. कधीही, कुठूनही काम करण्यासाठी खास करुन कोरोना लॉकडाउनच्या काळातील वर्क फ्रॉम होमनंतर लॅपटॉपचं महत्त्व अधिक अधोरेखित झालं आहे. घरुनच काम, घरुनच शिक्षणाच्या या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांकडूनही लॅपटॉपचा वापर वाढल्याचं पहायला मिळत आहे. अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हल्ली प्रोजेक्टसाठी लॅपटॉपची गरज लागते. मात्र लॅपटॉप घ्यायचं म्हटलं की किंमत डोळ्यासमोर येते.

खरंतर लॅपटॉप अगदी स्टार्टींग रेंजपासून ते महागड्या किंमतीपर्यंत उपलब्ध असतात. म्हणजेच सामान्यपणे लॅपटॉपची किंमत 25 हजारांहून अधिक असते. मात्र अगदी काही मोजके लॅपटॉप हे 15 हजारांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत. याच लॅपटॉप्सबद्दल जाणून घेऊयात...

1) लिनोव्हो स्लिम 3 क्रोमबूक

लिनोव्हो स्लिम 3 क्रोमबूक (Lenovo Slim 3 Chromebook) : लिनोव्हो स्लिम 3 क्रोमबूक टच इंटेल सेलेरॉन ड्युएल कोअर लॅपटॉप ग्राहकांना अर्ध्याहून कमी किंमतीत विकत घेता येईल. या लॅपटॉपवर तब्बल 60 टक्क्यांची सूट आहे. हा लॅपटॉप फ्लिपकार्टवर 39 हजार 990 रुपयांऐवजी 15 हजार 990 रुपयांना उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या लॅपटॉपवर एक्सचेंज ऑफर अंतर्गत 15 हजार 350 रुपयांची सूट दिली जात आहे. या लॅपटॉपमध्ये 4 जीबी रॅम आणि 1 वर्षाची ऑनसाइट वॉरंटी दिली जात आहे. 

2) असूस क्रोमबूक टच इंटेल सिलेरॉन

असूस क्रोमबूक टच इंटेल सिलेरॉन (Asus Chromebook Touch Intel Celeron) हा ड्युएल कोअर लॅपटॉप फ्लिपकार्टवर मूळ किमतीच्या 46 टक्के किंमतीला विकत मिळत आहे. हा लॅपटॉप 29 हजार 990 रुपयांऐवजी केवळ 15 हजार 990 रुपयांना विकत घेता येईल. एक्सचेंज ऑफरमध्ये हा लॅपटॉप अर्ध्या किंमतीला विकत मिळत आहे. या लॅपटॉपमध्ये 4 जीबी रॅम, क्रोम ऑप्रेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे. तसेच खास बाब म्हणजे हा टचस्क्रीन डिस्प्ले लॅपटॉप आहे. यावर एका वर्षाची ऑनसाइट वॉरंटी देण्यात आली आहे.

3) असूस क्रोमबूक फ्लिप टच सिलेरॉन ड्युएल कोअर

असूस क्रोमबूक फ्लिप टच सिलेरॉन ड्युएल कोअर (Asus Chromebook Flip Touch Celeron Dual Core) हा लॅपटॉप ग्राहकांना अर्ध्याहून कमी किंमतीत उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी या लॅपटॉपची ही सर्वात कमी किंमत असल्याचं सांगितलं जात आहे. हा लॅपटॉप फ्लिपकार्टवर 29 हजार 990 रुपयांऐवजी 14 हजार 990 रुपयांना उपलब्ध आहे. या लॅपटॉपची रॅम 4 जीबी आहे. एक्सचेंज ऑफरअंतर्गत या लॅपटॉपवर 14 हजार 450 रुपयांची सूट दिली जात आहे. यामध्ये 11.6 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे.