Mahindra XUV400 EV vs TATA NEXON EV MAX : इलेक्ट्रिक कारमधील स्पर्धा हळूहळू बाजारात तीव्र होऊ लागली आहे. जवळपास सर्वच अॅटोमोबाईल कंपनींने ईलेक्ट्रिक कार्सच्या बाजारपेठेत कार्स लाँच केल्या आहेत आणि आता त्यात भर पडलीये ती महिंद्रा कंपनीची. महिंद्राने आपली नवीन इलेक्ट्रिक SUV Mahindra XUV400 EV जगासमोर आणली आहे. या नवीन इलेक्ट्रिक कारची थेट स्पर्धा टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक कार TATA NEXON EV MAX शी असेल. ही स्पर्धा केवळ लूक, फीचर्स, टेक्नॉलॉजी आणि रेंज या बाबतीतच नाही तर किंमत आणि इतर अनेक गोष्टींमध्येही असणार आहे. असं असलं तरी, Mahindra XUV400 EV या कारची किंमत पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये जाहीर होणार आहे.
TATA NEXON EV MAX कारला सुरक्षिततेसाठी ड्युअल एअरबॅग्ज आहेत. याशिवाय मल्टी ड्राईव्ह मोड, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, क्रूझ कंट्रोल, झेड कनेक्ट कनेक्टेड कार अॅप, इलेक्ट्रिक सनरूफ, रिअर एसी व्हेंट्स देखील आहेत. कारला हिल होल्ड कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल, ऑटो होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, सर्व 4 डिस्क ब्रेक मिळतात. Mahindra XUV400 EV वर एअर सॉफ्टवेअर अपडेट फीचर, सिंगल पेडल टेक्नॉलॉजी, 378 लीटर बूट स्पेस, तीन ड्रायव्हिंग मोड आणि बरचं काही मिळतं.
Mahindra XUV400 EV ची MIDC नियमांनुसार 456 किलोमीटरची रेंज आहे, तर Tata Motors ची Tata NEXON EV MAX पूर्ण चार्ज केल्यावर 437 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. मॅक्सला IP67 रेटेड बॅटरी पॅक आणि मोटर मिळते. Mahindra XUV400 EV ला डस्टप्रूफ आणि वॉटरप्रूफ बॅटरी पॅक देखील मिळतो. याला IP67 प्रमाणपत्रासह बॅटरी देखील मिळते.
Mahindra XUV400 EV मध्ये 60 हून अधिक स्मार्ट कनेक्टिव्हिटी फीचर्स आहेत. यामध्ये स्मार्ट वॉच कनेक्टिव्हिटीचाही समावेश आहे. तर TATA NEXON EV MAX मध्ये Tata Motors Z Connect अॅपद्वारे 48 हून अधिक कनेक्टेड वैशिष्ट्ये आहेत.
Tata Nexon EV MAX 9 सेकंदांपेक्षा कमी वेळेत 0 ते 100 kmph चा वेग वाढवू शकतो, तर Mahindra XUV400 EV फक्त 8.3 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग वाढवू शकतो. त्याचा टॉप स्पीड 150 किमी प्रतितास आहे.
टाटा मोटर्सच्या TATA NEXON EV MAX या कारच्या किंमतीची सुरुवात 18.34 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) आहे, तर महिंद्राची महिंद्रा XUV400 EV, जी 8 सप्टेंबरला लाँच झाली होती, ती अद्याप जाहीर केलेली नाही. कंपनी जानेवारीच्या अखेरीस त्याची किंमत जाहीर करेल. या कारची सुरुवातीची किंमत 15-17 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते असं मानलं जातंय.