डिपॉझिट तयार ठेवा; तब्बल 1 लाख रुपयांच्या Discount सह खरेदी करा 'या' दमदार कार

Auto News: दिवाळीच्या मुहूर्तावर कार खरेदीचा बेत आखताय का? तर, तुमचा हा बेत कमालीचा यशस्वी ठरणार आहे. कारण, कारच्या किमतीवर मिळतेय दमदार सवलत.   

Updated: Nov 10, 2023, 03:05 PM IST
डिपॉझिट तयार ठेवा; तब्बल 1 लाख रुपयांच्या Discount सह खरेदी करा 'या' दमदार कार title=
Auto Car maruti Suzuki diwali discount on baleno jimny ciaz latest news

Auto News: दिवाळीच्या निमित्तानं सध्या अनेकजण विविध गोष्टी, उपकरणं इतकंच कार तर, वाहन खरेदीचेही बेत आखत असतील. दिवाळीच्या मुहूर्तावर कारची डिलिव्हरी मिळणार नसेल तरीही कार बुक तरी करु, असंही तुमच्यापैकी अनेकांनीच ठरवलं असेल. काय म्हणता, तुम्हीही ठरवलंय? उत्तम....! कारण ही तीच वेळ आहे जेव्हा तुम्हाला कार खरेदीच्या निर्णयाचा फायदाच होणार आहे. कारण, चक्क लाखभर रुपयांची सवलत तुम्हाला कार खरेदीवर मिळणार आहे. 

Maruti Jimny
मारूती सुझुकी कंपनीकडून कार खरेदीवर ही सवलत दिली जात आहे. कंपनीकडून सवलत दिल्या जाणाऱ्या कारमध्ये मारुतीच्या ऑफरोडर जिम्नी कारचा समावेश आहे. या एसयूव्हीवर कंपनीकडून 1 लाखांची सूट देण्यात येत आहे. रोट्रो लूक आणि ऑफरोडिंसाठी तुम्ही ही कार निवडू शकता. 

 Maruti Suzuki Baleno
मारुतीच्या बेस्ट सेलिंग मॉडेल बलेनोमध्येही कंपनीकडून 40 हजार रुपयांची सवलत देण्यात येत आहे. ज्यामध्ये 20 हजार रुपयांचा कॅशबॅक, 10 हजारांचा एक्सचेंज बोनस आणि 10 हजार रुपयांची वाढीव सवलत दिली जात आहे. 

Maruti Suzuki Ignis
तुम्हाला फायद्याचं डील देणारी आणखी एक कार म्हणजे, मारुती इग्निस. या कारवर कंपनी तब्बल 70 हजार रुपयांची घसघशीत सूट देतेय. त्यामुळं मूळ किंमतीत इतकी सूट म्हणजे तुमची चांदीच. 

हेसुद्धा वाचा : फळं, भाज्या किंवा इतर गोष्टी चिरण्यासाठी चॉपिंग बोर्ड वापरताय? जीव धोक्यात टाकताय...

Maruti Suzuki Ciaz
मारुती सुझुकीकडून सिअॅझवरसुद्धा दमदार ऑफर देण्यात आली आहे. साधारण 38 हजार रुपयांच्या घरात ही सवलत जात असून, या कारची एक्स शोरूम किंमत 9.30 लाख रुपये इतकी आहे. कंपनीकडून इतक्या सर्व कारवर सवलत दिली जात असतानाच काही मॉडेल्स मात्र आहेत त्याच दरात विक्रीस उपलब्ध आहेत. ज्यामध्ये फ्रॉन्क्स, इन्विक्टो, एक्सएल6, ग्रँड विटाराचा समावेश आहे. सवलतीची रक्कम आणि मॉडेल्सची उपलब्धता या निकषांवर कारच्या सवलतीचा एकूण आकडा निर्धारित केला जात आहे.