ऑडीच्या निवडक कारवर ८.८५ लाखांची सूट, २०१९ मध्ये द्या पैसे!

जर्मनीची लक्झरी कार निर्माता कंपनी ऑडी इंडियाने ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे.

Updated: Dec 2, 2017, 12:53 PM IST
ऑडीच्या निवडक कारवर ८.८५ लाखांची सूट, २०१९ मध्ये द्या पैसे! title=

नवी दिल्‍ली : जर्मनीची लक्झरी कार निर्माता कंपनी ऑडी इंडियाने ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. ऑडी कंपनीकडून त्यांच्या काही खास मॉडल्सवर ८.८५ लाख रूपयांपर्यंतची सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीच्या ऑडी रश नावाच्या या ऑफरनुसार ग्राहकांना आकर्षक सूटसोबतच ग्राहकांना परवणा-या ईएमआयचा पर्यायही देण्यात आला आहे. 

८.८५ लाख रूपयांपर्यंत सूट

या ऑफरनुसार कंपनीने त्यांच्या ऑडी ए3, ऑडी ए4, ऑडी ए6 आणि ऑडी क्यू3 या चार मॉडेलवर आकर्षक डिस्काऊंट आणि सोप्या ईएमआयची ऑफर दिली आहे. ऑडी इंडियाचं म्हणनं आहे की, या निवडक मॉडल्सवर तीन लाख रुपये ते ८.८५ लाख रूपयांपर्यंत सूट दिली जात आहे.  

२०१९ पासून द्या पैसे

कंपनीचं म्हणनं आहे की, ग्राहक त्यांची आवडती गाडी २०१७ मध्ये खरेदी करून त्याचे पैसे २०१९ पासून देण्याचा पर्याय निवडू शकतात. ही ऑफर लिमिटेड आहे. देशातील सर्वच ऑडी डिलरकडे ही ऑफर उपलब्ध असणार आहे.

किती असेल किंमत?

या मॉडेल्सवर डिस्काऊंट दिल्यानंतर कंपनीने नवीन किंमत जारी केली आहे. डिस्काऊंटनंतर ऑडी ए3 या कारची किंमत २६.९९ लाख रूपये झाली आहे. ऑडी ए4 ची किंमत ३३.९९ लाख रूपये, ऑडी ए6 ची किंमत ४४.९९ लाख आणि ऑडी क्‍यू3 ची किंमत २९.९९ लाख रूपये ठेवण्यात आली आहे. ऑडी रश ऑफर केवळ पेट्रोल व्हेरिएंटवरच लागू असणार आहे.