मुंबई : आपल्या आकाशगंगेपासून चार अब्ज प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या दिर्घीकांच्या महासमुहाचा म्हणजेच super cluster of galaxyचा शोध भारतीय खगोल शास्त्रज्ञांनी लावलाय.
आकाशातील ताऱ्यांच्या या महासमुहाला सरस्वती असं नाव देण्यात आलंय.
पुण्यातल्या आयुका, आयसर, एनआयटी जमशेदपूर तसेंच केरळच्या थोडुपुळामधल्या न्यूमन कॉलेजच्या संशोधकांनी हे यश मिळवलं आहे.
मीन राशीत सापडलेल्या सरस्वती या महासमुहात हजारो दिर्घीकांचे समुह आहेत. त्यांचे एकत्रित वस्तूमान २ कोटी अब्ज सूर्यांइतके असण्याचा अंदाज आहे.
विश्वाच्या निर्मितीनंतर दहा अब्ज वर्षांनी सरस्वती समुहाची अवस्था इतक्या स्पष्टपणे दिसत आहे. या शोधामुळे विश्वाच्या रचनेतील अनेक जुन्या संकल्पनांचा पुनर्विचार करावा लागणार आहे.