Apple iPhone 11 आणि iPhone 12 खरेदी करण्याची संधी, दोन्ही फोनवर सुरुये ऑफर

Apple iPhone 11, iPhone 12 offer : तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट Amazon India वर iPhone 11 आणि Apple iPhone 12 5G खरेदी करु शकता.

Updated: Mar 5, 2022, 07:33 PM IST
Apple iPhone 11 आणि  iPhone 12 खरेदी करण्याची संधी, दोन्ही फोनवर सुरुये ऑफर title=

मुंबई : Apple iPhone 11 आणि iPhone 12 पुन्हा एकदा स्वस्त झाले आहेत. तुम्ही ई-कॉमर्स वेबसाईट Amazon India वर 49,900 रुपयांत iPhone 11 खरेदी करू शकता. तर Apple iPhone 12 5G हा 53,999 रुपयांना खरेदी करु शकता. 

या दोन फोनच्या खरेदीवर अनेक ऑफर्सही दिल्या जात आहेत. अॅपलच्या या फोन्सच्या खरेदीवर 14,900 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे.

iphone 11 वर ऑफर

iPhone 11 च्या 64GB व्हेरिएंटची बेसिक किंमत 49,900 रुपये आहे. हा फोन पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये लाल, काळा, हिरवा, जांभळा, पांढरा आणि पिवळा रंगाचा समावेश आहे. फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात 6.1-इंचाचा Liquid Retina HD LCD डिस्प्ले आहे. फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा आहे. यामध्ये 12MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 12MP TrueDepth कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 12MP कॅमेरा दिला आहे. हा फोन A13 Bionic चिपसेटवर काम करतो.

फोनवर उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही हा फोन 2,349 रुपयांच्या EMI वर खरेदी करू शकता. तसेच, SBI, ICICI, कोटक बँक क्रेडिट कार्डने फोन खरेदी केल्यास 4,000 रुपयांची झटपट सूट मिळेल. याशिवाय अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत.

iphone 12 वर ऑफर

iPhone 12 च्या 64GB व्हेरिएंटची बेसिक किंमत 54,999 रुपये आहे. हा फोन पाच रंग पर्यायांमध्ये येतो. ज्यात लाल, काळा, निळा, हिरवा, जांभळा आणि पांढरा रंगाचा समावेश आहे. फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात 6.1-इंचाचा Liquid Retina Super Retina XDR डिस्प्ले आहे. फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा आहे.

12MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 12MP ट्रू डेप्थ कॅमेरा देखील देण्यात आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 12MP कॅमेरा असणार आहे. हा फोन A14 बायोनिक चिपसेटवर काम करतो.

या फोनवर उपलब्ध ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही हा 2,542 रुपयांच्या EMI वर खरेदी करू शकता. तसेच, फोनच्या खरेदीवर 14,900 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर असेल.