सेंट फ्रांसिस्को : अॅमेझॉन इको आणि गूगल होमला टक्कर देण्यासाठी अॅपलने स्मार्ट होम डिव्हाईस होमपॅड लॉन्च केले आहे. यात इन-बिल्ट डिजिटल असिस्टेंट सिरी आहे आणि बाजारात ९ फेब्रुवारीपासून हे विक्रीस उपलब्ध होईल. अॅपलचे वरिष्ठ उपाध्यक्ष फिलिप सिलर यांनी सांगितले की, होमपॅडचे डिझाईन सुंदर असून यात बीम-फार्मिंग ट्वीटर्स, एक हाई-एक्सकर्सन बूफर्स आहे.
त्यांनी सांगितले की, आम्ही यात संगीताची योग्य समज देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीची गाणी ऐकू शकता. यात नवीन गाण्यांचा समावेश केला आहे. यात तुम्ही कोणत्याही गाण्याची कमांड देऊ शकता.
हे स्मार्ट स्पीकर फ्रान्स आणि जर्मनीमध्ये लवकरच रिलीज करण्यात येईल. मात्र भारतात हे कधी उपलब्ध होईल याची माहिती देण्यात आली नाहीये.
अॅपलच्या स्मार्ट स्पीकरची किंमत ३४९ डॉलर आहे. पहिल्यांदा हे डिसेंबर महिन्यात बाजारात लॉन्च करण्यात येणार होते. मात्र आता २०१८ च्या सुरूवातीच्या महिन्यांमध्ये लॉन्च करण्यात येईल.