'शेम टू शेम'.... iPhone 14 सीरीज लॉन्च होताच नेटकरी सुस्साट, मीम्स पाहून हसतच राहाल

iPhone 14 नं तुमचाही हिरमोड केलाय का? 

Updated: Sep 8, 2022, 04:13 PM IST
'शेम टू शेम'.... iPhone 14 सीरीज लॉन्च होताच नेटकरी सुस्साट, मीम्स पाहून हसतच राहाल title=
Apple launched iPhone 14 Series memes gone viral

iPhone 14 : अखेर ज्याची प्रतीक्षा होती, तो दिवस उजाडला. अॅपल (Apple) कडून बहुप्रतिक्षित आयफोन 14 (iPhone 14 ) ची सीरिज लॉन्च करण्यात आली. iPhone 14 Series (iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro और iPhone 14 Pro Max) असे व्हॅरिएंट मोबाईल युजर्सच्या भेटीला आले. सोबतच Apple Watch Series 8 सुद्धा सादर करण्यात आलं. वाईटातल्या वाईट परिस्थितीतही हे घड्याळ काम करेल याची हमी यावेळी देण्यात आली. 

तिथे आयफोन 14 लॉन्च होताच इथे सोशल मीडियावर त्यासंबंधीच्या प्रतिक्रियांना उधाण आलं. कुणी या फोनची प्रशंसा केली, तर कुणी त्याची खिल्ली उडवली. आता iPhone ची खिल्ली का उडवली जातेय ? हाच प्रश्न तुम्हाला पडला ना? 

अनेकांना वाटतंय की, (iPhone 13) आयफोन 13 आणि आयफोन 14 यांच्यात फारसा फरक नसल्यामुळं अनेकांनीच ही गोष्ट हेरत निशाणा साधला. इथे नेटकऱ्यांची कल्पकता इतकी चाळवली की हे मीम्स पाहून हसणं थांबवता येईना. 

'या' देशानं बॅन केलाय iPhone 14 
ही बाब नवी नाही, की आयफोनसोबत चार्जिंग अडॅप्टर येत नाही. परिणामी ब्राझीलनं (Brazil) अॅपलचं हे प्रोडक्ट बिना चार्जरचं विकण्यावर बंदी झातली आहे. कंपनीला या देशानं No Charger Policy साठी दंडही ठोठावल्याची माहिती समोर आली आहे.