मुंबई : अॅपलच्या प्रोडक्सचं टेक्नॉलॉजी विश्वात अढळ स्थान आहे. जगभरात अॅपल प्रोडक्सचे ग्राहक आहेत. पण अॅपल आयफोनच्या ग्राहकांसाठी मात्र एक वाईट बातमी आहे. 2018 मध्ये आयफोन एक्स बंद होण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी अॅपलने आयफोन X हा नवा मोबाईल बाजारात आणला होता. हा फोन लिमिटेड स्टॉकमध्ये बनवला गेल्याने तो बेस्ट सेलिंग आयफोनपैकी एक ठरू शकला नाही. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, 2018मध्ये हा फोन बंद होण्याची शक्यता आहे. पहिल्या तिमाहीमध्ये या फोनचे 18 मिलियन युनिट्स विकले जातील. प्रोडक्शनमध्ये उशीर झाल्याने सुरूवातीच्या काळात या फोनच्या विक्री आणि डिलेव्हरीमध्येही उशीर झाला.
KGI सिक्योरिटीजचे विश्लेषक Ming-Chi Kuo यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयफोन एक्सचे क्रमांक निराशाजनक असल्याने अॅपलने या फोनची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. चीन देशातील ग्राहकांना आयफोन एक्स या फोनचा डिस्प्ले लहान वाटला. या फोनचा डिस्प्ले 5.8 इंच आहे. वापरण्याकरिता केवळ 5.5 इंच स्क्रीन आहे. आयफोन एक्सच्या तुलनेत 6 आणि 7 मध्ये डिस्प्ले स्क्रीन अधिक जास्त आहे. आयफोनलाही या सिरीजवर ग्राहकांकडून चांगली प्रतिक्रिया मिळाली होती.
iPhone X बाबत अजूनही कोणताही खास निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यासंबंधी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र Kuo यांच्या माहितीनुसार, 2018 च्या मध्यापर्यंत या फोनचं प्रोडक्शन बंद होईल. जगभरात या फोनचे ग्राहक 62 मिलियन युजर्स आहेत.
भारतामध्येही iPhone X ला चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. अनेकांना या फोनची किंमत अधिक असल्याचे वाटले. भारतामध्ये हा मोबाईल सुमारे 89000 रूपयांपासून पुढे विकला जातो.