आज गुगल डूडलवर झळकणार्‍या अनुसया साराभाई नेमक्या आहेत कोण ?

क्रिएटीव्हीटी आणि इन्फॉर्मेशन यांचा संगम म्हणजे गुगल डुडल.

Updated: Nov 11, 2017, 11:51 AM IST
आज गुगल डूडलवर झळकणार्‍या अनुसया साराभाई नेमक्या आहेत कोण ? title=

मुंबई : क्रिएटीव्हीटी आणि इन्फॉर्मेशन यांचा संगम म्हणजे गुगल डुडल.

आज ११ नोव्हेंबर २०१७ रोजी गुगलच्या होमपेजवर अनुसया साराभाई यांचे नाव झळकत आहे. पण कित्येकांना त्या नेमक्या कोण आहेत ? हे ठाऊकच नाही. मग तुमच्या मनातील या प्रश्नाचं हे पहा उत्तर -
 
 अनुसया साराभाई यांची आज १३२ वी जयंती आहे. म्हणूनच त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी गुगल डुडलमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे. गुजरातमध्ये अनुसया साराभाई यांना 'मोटाबेन' म्हणून ओळखले जाते. गुजरातीमध्ये मोटाबेन म्हणजे मोठी बहिण.  

अनुसया यांनी महिला  मजूरांसाठी भरीव कामगिरी केली आहे. त्यांनी अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन म्हणजेच मजूर महाजन संघाची १९२० साली स्थापना केली.  

वयाच्या नवव्या वर्षी अनुसयाजींवरील माता-पित्याचे छत्र हरपले होते. १३ व्या वर्षी त्यांनी लग्न केले. मात्र ते यशस्वी न झाल्याने त्या पुन्हा घरी परतल्या. घटस्फोट झाल्यानंतर  १९१२ साली त्या इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेल्या. वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या अनुसया पुढे लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्येही शिकल्या. 
भारतामध्ये परतल्यानंतर अनुसया यांनी गरीब आणि महिलांसाठी शाळा सुरू केली. दरम्यान 36 तास सलग काम करणार्‍या महिलांना पाहून त्यांनी याविषयी आवाज उठवला. महिलांना एकत्र करून आंदोलन आणि संपाचे हत्यार उपसले.  
मजूरांना ५० % वाढ मिळावी म्हणून प्रयत्न केले. परंतू महिन्याभराच्या प्रयत्नांनंतर सुमारे 35% वेतनवाढ मिळवून देण्यात त्या यशस्वी ठरल्या.