मुंबई : अनेक युजर्सचा डेटा लिक झाल्याच्या प्रकरणामुळे समाज माध्यमांतील (सोशल मीडिया) प्रभावी आणि विश्वव्यापी संकेतस्थळ फेसबुक सध्या भलतेच चर्चेत आहे. इंटरनेटवरील विश्वाचा एक सामाजिक भाग ठरलेल्या फेसबुकचे अनेक फायदे, तोटे आहेत. याचा मानवी भावभावना परिवर्तनासोबतच थेट आर्थिक हितसंबंधांशीही फार निकटचा संबंध आहे. अशा या फेसबुकप्रमाणेच भारतीय युवकही स्वदेशी कंपनी सुरू करू शकतात. ज्या कोणा भारतीयांना ही कंपनी सुरू करायची असेल त्या कंपन्यांना मंहिंद्रामदत करणार आहेत.
भारतातील अरबोपती उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. ट्विटरच्या माध्यमातून दिलेल्या या संदेशात त्यांनी म्हटले आहे, महिंद्रा अशा युवकांना निमंत्रीत करत आहे, जे भारताची स्वतंत्र अशी नेटवर्किंग साईट्स तयार करू इच्छितात.
आनंदर महिंद्रा यांनी म्हटले आहे की, कंपनी अत्यंत व्याप्त स्वरूपात आपल्या पारदर्शकतेबद्दल प्रामाणीक असेल. या युवकांच्या प्रयत्नातून अशी नेटवर्किंग कंपनी स्थापन होणार असेल तर, महिंद्रा समुह गुंतवणूक करायला तयार असल्याचेही ६२ वर्षीय आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे.
Beginning to wonder if it’s time to consider having our own social networking company that is very widely owned&professionally managed&willingly regulated.Any relevant Indian start-ups out there?If any young teams have such plans I’d like to see if I can assist with seed capital pic.twitter.com/nBSkQk0hCp
— anand mahindra (@anandmahindra) March 26, 2018
महिंद्रा यांच्या ट्विटचा अर्थ लावायचा तर सरळ सरळ असे दिसते की, भारतातील युवा टॅलेंटला न्याय देण्यासाठी अवाहन करत आहे. दरम्यान, यापूर्वी ३६ मार्चला बातमी आली होती की, डेटा लिक प्रकरणात चर्चेत आलेल्या फेसबुकमुळे संस्थापक झुकेरबर्ग याने पुन्हा एकदा माफी मागितली आहे. झुकेरबर्गने अनेक नामवंत वृत्तपत्रात पूर्ण पाण जाहिराती देऊन युजर्ससमोर माफिनामा सादर केला आहे.