मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या रिलायन्स जिओच्या धमाकेदार ऑफरबाबत नवी माहिती समोर आली आहे. जिओनं या धमाकेदार ऑफरच्या बातमीचं खंडन केलं आहे. मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानी यांच्या नावाचा वापर करून एका फेक ट्विटर अकाऊंटवरून ही बातमी व्हायरल करण्यात आली होती.
या ऑफरमध्ये ग्राहकांना ५०० रुपयांत १०० GB इंटरनेट डेटा देणार येईल तसंच या ऑफरमध्ये इंटरनेटचा स्पीड १ GBPS असणार आहे. सुरुवातीला १०० शहरांमध्ये ही सर्व्हिस सुरु करण्यात येईल. दिवाळीमध्ये या धमाकेदार ऑफरला सुरुवात होईल, अशी माहिती ईशा अंबानींच्या नावानं चालवण्यात येणाऱ्या त्या फेक अकाऊंटवरून देण्यात आली होती. पण जिओची अशी कोणतीही ऑफर नाही तसंच ईशा अंबानींच्या नावानं फेक अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली, असं स्पष्टीकरण रिलायन्स जिओकडून देण्यात आलं आहे.