मुंबई : दिवाळी, दसरा यांसारखे सण आता अवघ्या काहीदिवसांवर येऊन ठेपले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये सणासुदीच्या या दिवसांमध्ये ऑनलाईन शॉपिंकच्या मार्गानं आपल्या माणसांना सुरेख भेटवस्तू देत किंवा आपल्याला स्वत:लाच भेटवस्तूंचा नजराणा देत अनोख्या पद्धतीनं हे पर्व साजरा केलं जातं. त्याचाच अंदाज आणि सध्याची परिस्थिती विचारात घेत अनेक ऑनलाईन शॉपिंग साईट्स सवलती आणि बहुविध ऑफर्स ग्राहकांना देत आहेत. यामध्ये उत्सुकता लागून राहिली आहे ती म्हणजे ऍमेझॉन इंडियाच्या Amazon Great Indian Festivalची.
येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच १७ ऑक्टोबरपासून Amazon Great Indian Festivalची सुरुवात होणार आहे. प्राइम मेंबर्सना १६ तारखेपासूनच या सेलमधून खरेदी करता येणार आहे. या सेलमध्ये कवळपास ६.५ लाख उत्पादक कोट्यवधींच्या संख्येनं त्यांची उत्पादनं ऍमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध करुन देणार आहेत. ज्यामध्ये ग्राहक ४ कोटीहून अधिक लघू आणि मध्यम स्वरुपातील उद्योगातून आलेल्या वस्तूंची खरेदी करु शकतात. या सेलमध्ये जवळपास १०० शहरांमधील २० हजार दुकानांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती Amazon.inकडून देण्यात आली.
काय असतील सवलती?
HDFC च्या क्रेडीट आणि डेबिट कार्डनं खरेदी केल्यास तातडीनं १० टक्क्यांची सूट मिळणार आहे. तर, क्रेडीट आणि डेबिट कार्डवर नो कॉस्ट इएमआय असणार आहे. याव्यतिरिक्त एक्सचेंज ऑफर आणि Amazon pay कडून दररोज १० हजारांपर्यंतची बक्षीसं जिंकण्याची संधीही या सेलमध्ये ग्राहकांना मिळणार आहे.
खास वैशिष्ट्यं
जवळपास १ लाख दुकानं आणि किराणा माल विक्रेते सणावारांच्या या दिवसांमध्ये ऍमेझॉनच्या माध्यमातून थेट ग्राहतांपर्यंत पोहोचू शकणार आहेत. ऍलेक्सा एक्सक्लूझिव्ह डील्समधूनही ग्राहकांना काही धमाकेदार ऑफर्स मिळणार आहेत. वस्तूंचा शोध घेण्यासाठी आता तुमच्या आवाजाचाही वापर होणार आहे.
भारतीय ग्राहकांची एकूण संख्या पाहता आता या भल्यामोळ्या बाजारपेठेत इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलुगू , मल्याळम आणि कन्नड अशा भाषांचा वापर करुन ग्राहकांना खरेदीचा आनंद लुटता येणार आहे.