Google Chrome युजर्स आताच्या आता Delete करा हे App; नाहीतर मिळेल जबरदस्त दणका

Google Chrome युजर्स आताच्या आता Delete करा हे App; नाहीतर मिळेल जबरदस्त दणका 

Updated: Nov 11, 2022, 09:33 AM IST
Google Chrome युजर्स आताच्या आता Delete करा हे App; नाहीतर मिळेल जबरदस्त दणका  title=
alert for Google Chrome users Delete app stay safe from cyber Attack

Google Chrome : मोबाईल जुना असो किंवा नवा, यामध्ये काही Apps आपण अगदी न चुकता Download करतो. यातलंच एक अॅप म्हणजे गुगल क्रोम (Google Chrome). पण, हेच गुगल आता मात्र अनेकांसाठी धोक्याची सूचना देत आहे. तुमच्याही मोबाईलमध्ये गुगल App असेल तर, त्याच्या घातक एक्सटेंशनपासून सावध राहा. कारण, तो थेट तुमच्या मोबाईलच्या ऑपरेटिंग सिस्टीमवरच नजर ठेवत आहे. 

एका प्रसिद्ध माध्यम संस्थेच्या माहितीनुसार या एक्सटेंशनच्या माध्यमातून हॅकर्स तुमच्या मोबाईलच्या ऑपरेटिंग सिस्टीममधून सर्व पासवर्ड (Password) आणि इतर माहितीवर नजर ठेवतात. 

वाचा : Geyser खरेदी करण्यापूर्वी या बाबी लक्षात ठेवा, विजेसोबत पैशांची होईल बचत

हॅकर्स (hackers) नेमकं काय करतात? 

सुदैवानं हे एक्सटेंशन अधिकृत गुगल क्रोम स्टोअरमध्ये उपलब्ध नाही. अॅप किंवा (Play store) प्ले स्टोअरव्यतिरिक्त तुम्ही जर हे अॅप डाऊनलोड करत असाल तर मात्र तुम्ही धोक्यात आहात.  हे अॅप बनावट Adobe Flash Palyer वर विजिबल असतं. फक्त क्रोम युजर्सच नाही, तर मायक्रोसॉफ्ट (Miscrosoft) युजर्नाही या प्रकरणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कारण, इथंही एक्सटेंशनचा वापर करत हॅकर्स त्यांचा डाव साधत आहेत. 

या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका 

ही बाब अतिशय स्पष्टपणे सांगण्यात आली आहे, की सध्याच्या घडीला हॅकर्सचा समूह Browser आणि Operating Groups ना निशाण्यावर घेच आहेय यासाठी संशयास्पद नोटिफिकेशन आणि इतर गोष्टींवर युजर्सनं लक्ष देणं गरजेचं आहे. 

वाचा : Jio 5G चा बंपर धमाका! या 2 शहरांमध्ये 5 जी सर्व्हिस

सध्याच्या घडीला या फसवणुकीपासून वाचण्यासाठी Google Chrome ना या अॅपचं लेटेस्ट वर्जन डाऊनलोड आणि अपडेट (Update) करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शिवाय यामध्ये असणाऱ्या Privacy आणि Security बाबतच्या आवश्यक सेटिंग्स करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.