एअरटेलचा मायक्रोमॅक्स सोबत करार, आता मिळवा अनलिमिटेड ४जी डेटा

प्रमुख दूरसंचार कंपनी भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आल्यानंतर अन्य टेलिकॉम कंपन्यांसह कठीण स्पर्धेत भिडत आहे. ह्यामधे एका मागोमाग नवीन ऑफर्स देत आहे कारण नवीन ग्राहक जोडले जातील. त्याच अंतर्गत मायक्रोमॅक्स कंपनीसोबत करार करत अनलिमिटेड ४जी डेटा देणार आहे.

Updated: Jun 8, 2017, 08:42 PM IST
एअरटेलचा मायक्रोमॅक्स सोबत करार, आता मिळवा अनलिमिटेड ४जी डेटा title=

नवी दिल्ली :  रिलायन्स जिओ आल्यानंतर देशातील अन्य टेलिकॉम कंपन्यांमध्ये जोरदार प्राईज आणि डेटा वॉर सुरू झाले आहे. आता यात देशातील प्रमुख दूरसंचार कंपनी भारती एअरटेलनेही उडी घेतली आहे. कंपनी आता एका मागोमाग नवीन ऑफर्स देत आहे.  त्यामुळे नवीन ग्राहक जोडले जातील असा कंपनीचा अंदाज आहे. त्यामुळेच आता कंपनी मायक्रोमॅक्स कंपनीसोबत करार करत अनलिमिटेड ४जी डेटा देणार आहे.

मायक्रोमॅक्स कॅनव्हास-२ खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एअरटेल एक वर्षासाठी अनलिमिटेड ४जी डेटा उपलब्ध करून देणार आहे. या संदर्भात दोन कंपन्यांमध्ये करार झाला आहे. याबाबत मायक्रोमॅक्स कंपनीने ट्वीट सुध्दा केले आहे. 

मायक्रोमॅक्स मुख्य विपणन अधिकारी सुभाजीत सेन यांनी या संदर्भात गेल्या आठवड्यात सांगितले, की  मायक्रोमॅक्स कॅनव्हास-२ वर एक वर्ष एअरटेल टू एअरटेल कॉलिंग आणि अनलिमिटेड सुविधेचा वापर जुन्या आणि नवीन ग्राहकांना वापरता येईल. मायक्रोमॅक्स कॅनव्हास-२ ११.९९९ रुपये किंमतीसह बाजारात आला आहे.