Kartik Aaryan Range Rover SV: भारतीयांना क्रिकेटर्स आणि बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल विशेष आकर्षण असते. त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांपासून ते वापरत असलेल्या वस्तू मार्केटमध्ये चर्चेत असतात. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींकडे कोणत्या कार आहेत, हे त्यांच्या चाहत्यांना माहिती असते. आता बॉलीवूड इंडस्ट्रीचा उगवता स्टार कार्तिक आर्यन हा त्याच्या कारमुळे चर्चेत आलाय. कार्तिकने घेतलेली कार खूपच खास आहे. रणबीर सिंग, सुनिल शेट्टी, शाहरुख खान, अजय देवगण, हृतिक रोशन यांच्याप्रमाणे कार्तिक आर्यन हादेखील कार प्रेमी आहे. तो आपल्या गॅरेजमध्ये अनेक भारतीय आणि परदेशी वाहने ठेवतो. कार्तिक आर्यनच्या कलेक्शनमध्ये लंबोर्गिनी उरुस, मॅकलॅरन जीटी, मिनि कॉपर आणि डुकाडी स्क्रॅम्ब्लर 1100 या कार्स आहेत. अनेकदा विविध कार्यक्रमांमध्ये तो आकर्षक कार्समधून दिसत असतो. अनेकदा रस्त्याच्या बाजुला कार थांबवून चाहत्यांना सेल्फी देताना तो दिसतो. सध्या कार्तिक आर्यनने नुकतीच रेंज रोव्हर एसव्ही खरेदी केली आहे.
कार्तिक आर्यनने स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या कारचा फोटो पोस्ट केला आहे. कार्तिकच्या कार कलेक्शनमध्ये नवीन लँड रोव्हर रेंज रोव्हर एसव्ही जोडली गेली आहे. या कारबद्दल कारप्रेमींमध्ये नेहमीच आकर्षण राहिले आहे. या कारची काय विशेषता आहे? भारतात याची काय किंमत आहे? या कारचं इंजिन कसं काम करतं? असे अनेक प्रश्न कारप्रेमींच्या मनात असतात.याबद्दल जाणून घेऊया. रेंज रोव्हर एसव्ही लक्झरी एसव्ही गेल्यावर्षी भारतात लॉन्च करण्यात आली होती. ही कार ब्रिटिश लक्झरी एसयूव्हीवरुन प्रेरित आहे. सर्वात शक्तिशाली प्रकारातील कारमध्ये रेंज रोव्हर एसव्हीचा नंबर लागतो. एसव्ही लँड रोव्हरच्या स्पेशल व्हेईकल ऑपरेशन्सने विकसित केली आहे. आर्यनने लाँग व्हीलबेस मॉडेल विकत घेतली आहे.
रेंज रोव्हरच्या तुलनेत एसव्हीमध्ये एक नवीन फ्रंट बंपर आणि 5-बार ग्रिल आहे. त्यात गुळगुळीत सिरॅमिक आणि लाकूड वापरण्यात आले आहे. ग्राहकांना 23 इंचांपर्यंत अलॉय व्हील निवडण्याचा पर्याय आहे. नवीन रेंज रोव्हर एसव्हीला 4.4-लीटर व्ही 8 इंजिन देण्यात आले आहे. ही पॉवरट्रेन 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह 626 bhp आणि 750 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यासाठी ट्यून केलेली आहे. त्याचा टॉप स्पीड 290 किमी प्रतितास आहे. तो फक्त 3.6 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग वाढवतो.
रेंज रोव्हर एसव्ही लक्झरी एसव्ही ज्याप्रमाणे तिच्या स्पीड, इंजिनमुळे ओळखली जाते. त्याप्रमाणे ती तिच्या किंमतीमुळेही सगळ्यांच्या लक्षात राहिली आहे. समोर आलेल्या माहिती नुसार भारतातील रेंज रोव्हर एसव्हीची एक्स शोरुमची सध्याची किंमत 3 कोटी 85 लाख ते 4 कोटी 17 लाख इतकी आहे.