भारतात लवकरच 5G सर्व्हिस सुरु होणार आहे. देशात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव देखील झाला आहे. रिलायन्स, भारती एअर टेल आणि वोडाफोन आयडिया या तिन्ही कंपन्यांच्या माध्यमातून आपल्याला या सर्व्हिसेस देणार आहेत. 5G आल्याने तुम्हा आम्हा सर्वांचा डिजिटल एक्सपीरियन्स पूर्णपणे बदलणार आहे. मात्र डिजिटल युग हे अतिशय वेगवान पद्धतीने पुढे जातंय, बदलतंय. एकीकडे भारतात 5G सुरु होतानाच आता जगाला वेध लागलेत 6G चे. भारतही यात मागे नाही. भारतानेही 6G ची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी भारताने 6G टेक्नोलॉजी इनोव्हेशन ग्रुप तयार केलाय.
नुकत्याच पार पडलेल्या International Telecommunication Union Regional Standardisation च्या उदघाटनावेळी देवूसिंह चौहान यांनी 5G बाबत तर माहिती दिलीच, सोबतच भारतात 6G Technology Innovation Group सेट केलाय हेही सांगितलं. हा ग्रुप स्वदेशी 6G तंत्रज्ञानांवर काम करणार आहे. त्यांनी यापुढे सांगितलं की, सरकार स्वदेशी डिझाईन, डेव्हलपमेंट आणि अत्याधुनिक टेलिकॉम तंत्रज्ञान बनवण्यावर भर देत आहे.
6G नेटवर्कवरील युझर एक्सपीरियन्स 5G पेक्षा अतिशय वेगळा असणार आहे. दूरसंचार विभागाच्या माहितीनुसार 5G सर्व्हिसेस सुरु झाल्याने युझर्सना 4G च्या तुलनेत 10 पट अधिक इंटरनेट स्पीड मिळणार आहे. याने कन्टेन्ट अधिक जलदगतीने डाउनलोड होणार आहे, सोबतच नेटवर्क क्वालिटीही अधिक चांगली होणार आहे.
अजूनही जगभरात 5G चा विस्तार झालेला नाही. मात्र अशातही काही देशांनी 6G वर काम करण्यास सुरुवात केली आहे. जपानने 6G वर नेटवर्क तयार करण्यास सुरुवात केली आहे. 6G वर तुम्हाला 5G पेक्षा 100 पट अधिक स्पीड मिळू शकेल असं बोललं जातंय. या स्पीडने तुम्ही 1 सेकंदात 142 तासांचा व्हिडीओ डाउनलोड करू शकतात.
6 जूनला जपानची प्रमुख टेलिकॉम कंपनी NTT DOCOMO ने NEC, Fujitsu आणि Nokia सोबत पार्टनरशिप करून 6G ट्रायल प्लॅनची घोषणा केली आहे. 2030 पर्यंत 6G सर्व्हिसेस कमर्शिअली लॉन्च करण्याची घोषणाही केली आहे. जपानसारखीच भारतानेही 6G ची तयारी सुरु केली आहे. सरकारने याच वर्षाच्या मार्च महिन्यात 2030 पर्यंत भारतातही 6G तंत्रज्ञान येणार उपलब्ध होईल असं म्हंटलं होतं.
एक Petabit म्हणजेच 10 लाख गिगाबाईट डाटा. 5G वर आपल्याला 10 GBPS प्रति सेकंद ट्रान्समिशन डेटा उपलब्ध होणार आहे. याच्या तुलनेत NICT चा डेमो तब्बल एक लाख पट जलद असणार आहे. असं बोललं जातंय, 6G वर युझर्सना 1TB प्रति सेकंद स्पीड मिळू शकेल. NICT च्या माहितीनुसार Petabit प्रति सेकंद म्हणजेच 8K रिझोल्युशनचे 1 कोटी चॅनल्स एकाच वेळी ब्रॉडकास्ट करणं शक्य होऊ शकतं. पण सर्वसामान्यांपर्यंत इतका स्पीड खरंच पोहोचेल का यावर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.
6G speed and all the detail you need to know about real future 6G SB