visit to india

भारत दौऱ्यात भूतानचा छोटा प्रिन्स ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू

  एखाद्या राष्ट्राचे अध्यक्ष आले की एखादा करार होता, मग आपले आणि त्या देशाचे प्रमुख एकमेकांना शेकहँड करतात.... एखादी संयुक्त पत्रकार परिषद होते.... आणि दौरा संपतो..... पण सध्या भूतानचा राजा भारतात आलाय.... पण त्याचा दौरा मात्र खूप आकर्षक ठरतोय.... 

Nov 2, 2017, 10:33 PM IST

भारत दौऱ्यावर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिकेचे स्टेट सेक्रेटरी

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी आज भारतात आले आहेत. भारतातील त्यांच्या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतील. गेल्या काही दिवसांमध्ये अशरफ गनी हे तिसरे सर्वात मोठे व्यक्ती आहेत. जे भारतात आले आहेत. यापूर्वी, अफगाणिस्तानचे मुख्य कार्यवाह अब्दुल्लाह अब्दुल्ला आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सलाहुद्दीन रब्बानी यांनी भारताला भेट दिली होती. दोन्ही नेत्यांनी गेल्या आठवड्यात भारताला भेट दिली होती. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल 16 ऑक्टोबरला हनिफ अतमार यांना भेटण्यासाठी काबुलमध्ये गेले होते.

Oct 24, 2017, 11:36 AM IST

भारत विरोधी कारवायांसाठी नेपाळच्या धरतीचा वापर होऊ देणार नाही -पंतप्रधान देउबा

नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देउबा सध्या भारत दौऱ्यावर आहेत. दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले. एकूण आठ करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. करार झाल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देउबा यांनी म्हटलं की, 'मी पंतप्रधान मोदी यांच्या शेजारील देशांसोबत आधी संबंध आणि सबका साथ सबका विकास या गोष्टीचं कौतूक करतो.' 

Aug 24, 2017, 04:08 PM IST

अफगानिस्तानचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर, पाकिस्तानला करणार लक्ष्य

अफगानिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी हे उद्या म्हणजेच बुधवारी दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहेत. या दरम्यान गनी भारताला सैन्य सहायतेमध्ये वाढ करण्याची देखील मागणी करु शकतात.

Sep 13, 2016, 10:14 PM IST

बराक ओबामा तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी भारताकडे रवाना...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत दौऱ्यासाठी वॉशिंग्टनहून रवाना झालेत. मेसीलँड इथल्या अँड्यूज एअरबेसवरुन ओबामा आणि फर्स्ट लेडी मिशेल एअरफोर्स वन विमानानं भारत दौ-यासाठी रवाना झालेत..  

Jan 24, 2015, 11:50 PM IST