कात्रजमध्ये अतिक्रमण कारवाईला हिंसक वळण, पथकावर दगडफेक
कात्रजमध्ये अतिक्रमण कारवाईला आज हिंसक वळण लागलं. इथल्या गोकुळनगरमध्ये अनधिकृत झोपड्या उठवण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर जमावानं दगडफेक केली.
Mar 15, 2018, 11:18 PM ISTनेवाळीत हिंसक वळणानंतर नौदलाला तात्पुरते काम थांबवण्याच्या सूचना
नेवाळीत पेटलेल्या संघर्षानंतर नौदलाला तात्पुरते काम थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली.
Jun 22, 2017, 08:12 PM ISTविनाअनुदानित शिक्षकांच्या मोर्चाला हिंसक वळण
औरंगाबादमध्ये विनाअनुदानित शाळेतल्या शिक्षकांवर जबर लाठीमार करण्यात आला आहे. शिक्षकांच्या या मोर्चाला हिंसक वळण लागलं आहे. आपल्या मागण्यांसाठी या शिक्षकांनी मंत्रिमंडळ बैठकीच्या ठिकाणी मोर्चा काढला होता. त्यावेळी शिक्षकांनी रस्ते अडवल्यानं पोलिसांनी लाठीमार केला. त्यावेळी काही शिक्षकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या धुमश्चक्रीत 22 शिक्षक आणि 9 पोलीस जखमी झाले आहेत. जखमी शिक्षकांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. तर याच ठिकाणी कर्तव्यासाठी असलेल्या एक पोलीस कॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. मात्र त्यांचा मृत्यू नेमका कशामुळं झालाय याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Oct 5, 2016, 08:03 AM IST