vidhansha

पत्रकारांवरील हल्ले आणि मिळणाऱ्या धमक्यांबाबतचा प्रश्न विधानसभेत उपस्थित

राज्यात पत्रकारांवर होणारे हल्ले आणि पत्रकारांना मिळणाऱ्या धमक्यांबाबतचा प्रश्न विधानसभेत आज उपस्थित करण्यात आला. आमदार अॅड. आशिष शेलार यांनी हा प्रश्न उपस्थित केला. यावेळी पत्रकारांना संरक्षण कधी मिळणार, तसा कायदा होणार आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. डॉक्टरांकडून 'झी 24 तास'चे मुख्यसंपादक डॉ. उदय निरगुडकर यांना धमकी देण्यात आली होती.

Apr 1, 2017, 11:34 AM IST