मुंबई : राज्यात पत्रकारांवर होणारे हल्ले आणि पत्रकारांना मिळणाऱ्या धमक्यांबाबतचा प्रश्न विधानसभेत आज उपस्थित करण्यात आला. आमदार अॅड. आशिष शेलार यांनी हा प्रश्न उपस्थित केला. यावेळी पत्रकारांना संरक्षण कधी मिळणार, तसा कायदा होणार आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. डॉक्टरांकडून 'झी 24 तास'चे मुख्यसंपादक डॉ. उदय निरगुडकर यांना धमकी देण्यात आली होती.
झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांना आलेल्या धमक्यांचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. आमदार आशिष शेलार यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. निरगुडकर यांना दिल्या जात असणा-या धमक्या चुकीच्या असल्याचं मत डॉक्टर असलेले लोकप्रतिनिधी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि डॉक्टर सुजित मिणचेकर यांनी व्यक्त केलंय.
डॉक्टरांनी न्याय जरूर मागावा पण माध्यमांना धमक्या देणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हंटलंय. मार्ड' संपाबाबत झी 24 तासवरून वास्तववादी भूमिका मांडल्यामुळे डॉ. निरगुडकर यांना समाज माध्यमातून धमक्या दिल्या जातायत. इतकंच नव्हे, तर राज्याबाहेर शिकणाऱ्या त्यांच्या मुलीलाही धमक्या येतायेत. हे सगळं चुकीचं असल्याचं डॉक्टर असलेल्या आमदारांनी म्हटले.