व्हेंटिलेटर सर्वत्र हाऊसफूल, प्रेक्षकांच्या भावूक प्रतिक्रिया
चित्रपट हे मनोरंजनाचं माध्यम असलं तरी अनेकदा हे माध्यम आपल्याला आरसा दाखवण्याचं काम करतं आणि आपलं रुप त्यात बघून आपल्याला हरवलेलं काही तरी सापडतं. कधी तो हरवलेला आत्मविश्वास असतो, कधी हरवलेलं प्रेम तर कधी हरवलेली नाती. दूर गेलेल्या नात्यांना आणि एकाच कुटुंबात राहूनही दुरावलेल्या मनांना एकत्र आणण्याचं किंवा त्यांना आरसा दाखवण्याचं काम सध्या एक मराठी चित्रपट करतोय आणि त्याच्या याच कामाचं कौतुक समाजमाध्यमं आणि प्रेक्षकांच्या चर्चेतून ऐकायला मिळतंय. हा चित्रपट म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला व्हेंटिलेटर. एक चित्रपट काय करु शकतो याची प्रचिती सध्या व्हेंटिलेटरच्या निमित्ताने बघायला मिळत आहे. असाच काहीसा अनुभव दिग्दर्शक राजेश मापुसकर आणि अभिनेते जितेंद्र जोशी यांना डोंबिवलीतील टिळक चित्रपटगृहात आला. दिग्दर्शक राजेश मापुसकर , पात्र संयोजक रोहन मापुसकर, जितेंद्र जोशी, विजय निकम, भूषण तेलंग, आशा ज्ञाते यांनी काल डोंबिवलीतील टिळक आणि मधुबन चित्रपटगृहात रसिकांबरोबर चित्रपट पाहिला.
Nov 8, 2016, 05:30 PM IST