titwala

राज ठाकरेंचा गणपती बाप्पाकडे धावा...

 कल्याण डोंबिवलीत यशासाठी मतदारांसोबतच राज ठाकरेंनी गणेशाचाही धावा सुरू केलाय. राज ठाकरेंनी टिटवाळ्याला महागणपतीचं दर्शन घेतलं. महागणपतीचा अभिषेक करून पक्षाला चांगलं यश मिळू दे असं साकडं त्यांनी महागणपतीला घातलं. सुमारे अर्धा तास राज ठाकरे मंदिरात होते. राज यांच्यासोबत अमित ठाकरे आणि मनसेचे इतर नेतेही उपस्थित होते. 

Oct 28, 2015, 07:29 PM IST

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू

टिटवाळा आणि आंबिवली दरम्यान लोकल ट्रेनचे पाच डबे घसरल्यामुळे कालपासून मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ती आता पूर्ववत सुरू झाली आहे.

Mar 21, 2014, 09:40 AM IST

टिटवाळ्याजवळ लोकलचे ४ डबे घसरले

सेंट्रल रेल्वेच्या लोकलचे चार डबे टिटवाळाजवळ घसरले आहेत. या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

Mar 20, 2014, 04:12 PM IST

टिटवाळ्यात ज्वेलरला लुटलं

टिटवाळ्यामध्ये ओम साई ज्वेलर्सचे मालक अरविंद शेलार दुकान बंद करून सोनं घरी घेऊन जात असताना त्यांना लुटल्याची घटना घडली आहे.

Nov 11, 2013, 01:25 PM IST