sushil kumar

आर.एस.पुरा सेक्टरमधील गोळीबारात बीएसएफ जवान शहीद

जम्मूच्या आर एस पुरा, अर्णिया, अखनूर सेक्टरमध्ये काल रात्रभर पाकिस्तानच्या बाजूनं पुन्हा एकदा अकारण गोळीबार करून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय. 

Oct 24, 2016, 07:48 AM IST

सुशील कुमारचं ऑलिम्पिकसाठीचं स्वप्न भंगलं

सुशील कुमारचं रियो ऑलिम्पिकसाठी भारताचं प्रतिनीधीत्व स्वप्न भंगलंय. दिल्ली हायकोर्टानं ऑलिम्पिकसाठी नरसिंग यादव आणि सुशील कुमारमध्ये ट्रायल होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे सुशील कुमारला रियो ऑलिम्पिकला जाता येणार नाही. त्याचप्रमाणे याप्रकरणात हस्तक्षेप करण्यासही कोर्टानं नकार दिलाय. तसंच सुशील कुमारची याचिकाही कोर्टानं फेटाळून लावली. त्यामुळे आता रियो ऑलिम्पिकमध्ये 74 किलो वजनीगटात नरसिंग यादवचं भारताचं प्रतिनिधीत्व करेल. 

Jun 6, 2016, 05:09 PM IST

कुस्तीचा वाद आता कोर्टात

दोन वेळा ऑलिम्पिकचं मेडल पटकवाणारा कुस्तीपटू सुशीलकुमार रिओ ऑलिम्पिक 2016मध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी आता कोर्टात गेला आहे

May 16, 2016, 06:14 PM IST

सुशील कुमारची रिओवारी धोक्यात

दोनवेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारा कुस्तीपटू सुशील कुमारच्या रिओ ऑलिम्पिकमधील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.  

May 12, 2016, 01:35 PM IST

महिलेने उचलले गोल्डन बॉय सुशील कुमारला, फोटो झाला व्हायरल

२० व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुन्हा एकदा सुशील कुमारच्या नेतृत्वाखाली कुस्तीपटूंनी शानदार प्रदर्शन करत पाच गोल्ड मेडल भारताच्या पारड्यात टाकले आहे. सुमारे आठ वर्षांपासून एकानंतर एक पदक आपल्या नावावर करणाऱ्या सुशील कुमार ग्लासगोमध्ये सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. त्यामुळेच गोल्ड मेडल जिंकल्यावर एका कॅनेडियन महिला खेळाडूने त्याला आपल्या हातांनी उचलून घेतले आहे. आता हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  

Aug 1, 2014, 06:20 PM IST

जागतिक कुस्ती स्पर्धा: भारताच्या अमितकुमारला रौप्यपदक

जागतिक कुस्ती स्पर्धेतील ५५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या आशिया चॅम्पियन अमितकुमारनं रौप्यपदक जिंकलंय.

Sep 17, 2013, 09:42 AM IST

कुस्तीचं फिक्सिंग, सुशीलकुमारचा गौप्यस्फोट

क्रिकेटमध्ये फिकिंग्स होते हे काही आता नवीन नाही मात्र आता कुस्तीसारख्या खेळामध्येही फिक्सिंगचं भूत आलंय. हे फिक्सिंगचं भूत छोट्या-मोठ्या स्पर्धांमध्ये नाही तर चक्क ऑलिम्पिकमध्ये सारख्या स्पर्धांमध्येही असल्याचा गौप्यस्फोट केलाय भारताच्या ऑलिम्पिक मेडलिस्ट सुशीलकुमारनं.

Aug 24, 2013, 12:29 PM IST

अन्यथा आम्ही पदकं परत करू- कुस्तीवीर

२०२०च्या ऑलिम्पिकमधून कुस्तीला हद्दपार करण्यात आलं आहे. या गोष्टीला भारतातील नामांकीत कुस्तीवीर सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त यांनी विरोध केला आहे. कुस्तीच्या हद्दपारीच्या निषेधार्थ आपल्याला यापूर्वी मिळालेली पदकंही परत करण्यास हे तयार झाले आहेत.

Mar 7, 2013, 10:14 PM IST

सुशीलकुमारसह योगेश्वर, मेरीचे जंगी स्वागत

लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला सहावे मेडल मिळवून देणाऱ्या भारतीय कुस्तीपटू सुशीलकुमार याच्यासह योगेश्वर दत्तचे दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी सुशीलकुमार भारावून गेला होता.

Aug 14, 2012, 09:26 PM IST

सुशीलला रौप्यपदक; कौतुकाचा वर्षाव

भारतीय कुस्तीपटू सुशील कुमारने लंडन ऑलिम्पिकमध्ये झालेल्या ६६ किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये सिल्व्हर मेडल मिळवलंय. फायनलमध्ये त्याला जपानच्या योनेमित्सु तात्सुहिरोकडून ३-१ ने पराभवाचा धक्का पचवावा लागलाय.

Aug 12, 2012, 06:38 PM IST

सुशील कुमार फायनलमध्ये

भारतीय कुस्तीपटू सुशील कुमारने फायनल मॅचमध्ये धडक मारली. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताकरता ब्राँझ मेडल जिंकणा-या सुशील कुमारकडून गोल्ड मेडलची अपेक्षा सर्वांनाच आहे.

Aug 12, 2012, 03:37 PM IST

लंडन ऑलिम्पिक: घुमणार रेहमानचे सूर

सर्वांनाच वेध लागतेल ते लंडन ऑलिम्पिकचे... या ऑलिम्पिकमध्ये फक्त भारतीय खेळाडूच नाही तर भारतीय कलाकारही आपलं कौशल्य दाखवण्यास सज्ज झालेत. जगविख्यात ए. आर. रेहमानच्या गाण्यानेच ऑलिम्पिकची सुरवात होणार असून या ऑलिम्किचं भारतीय कनेक्शन कसं असणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलेली दिसून येतंय.

Jul 27, 2012, 11:10 AM IST

सुशील कुमार द रिअल बिग बॉस

कौन बनेगा करोडपतीमध्ये पाच कोटी रुपये जिंकणारा पहिला स्पर्धक सुशील कुमराने रिअल्टी शो बिग बॉसची ऑफर नाकारली आहे. एण्डेमोल इंडियाने माझ्याशी संपर्क साधला आणि मला बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली पण मी नकार दिला असं सुशील म्हणाला. इतर कोणत्याही गोष्टी पेक्षा मला माझी प्रतिमा महत्वाची आहे आणि तिला तडा जाईल असं काहीही मला करायचं नाही असं सुशीलने सांगितलं.

Nov 24, 2011, 05:09 PM IST

बिहारच्या सुशीलकुमारने 'केबीसी'त जिंकले ५ कोटी

या वेळच्या पाचव्या सीझनमध्ये ५ कोटीची घसघशीत रक्कम जिंकली ती बिहारच्या सुशील कुमार याने. ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्‍ये आतापर्यंत कोणालाही ५ कोटी रुपये जिंकता आले नाही. सुशील कुमार हा ६ हजार रुपये वेतनावर संगणक ऑपरेटरचे काम करतो.

Oct 25, 2011, 03:03 PM IST