www.24taas.com, लंडन
सर्वांनाच वेध लागतेल ते लंडन ऑलिम्पिकचे... या ऑलिम्पिकमध्ये फक्त भारतीय खेळाडूच नाही तर भारतीय कलाकारही आपलं कौशल्य दाखवण्यास सज्ज झालेत. जगविख्यात ए. आर. रेहमानच्या गाण्यानेच ऑलिम्पिकची सुरवात होणार असून या ऑलिम्किचं भारतीय कनेक्शन कसं असणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलेली दिसून येतंय.
लंडनच्या या शानदार सोहळ्याच्या सुरवातीलाच एक भारतीय चेहरा जगासमोर येणार आहे... लंडनमध्ये ए. आर. रेहमानची जादू दिसणार... होय, लंडन ऑलिम्पिकची सुरुवात होणार आहे ती ए. आर. रेहमानच्या गाण्यानं... डॅनी बॉयलचं दिग्दर्शन असलेल्या गाण्याला रेहमानने संगीतबद्ध केलंय आणि हेच गाणं रेहमान जगासमोर लाईव्ह सादर करताना दिसणार आहे. रेहमानची ही नवीन धून कोणती? रेहमान कोणतं गाणं सादर करणार आहे? याबाबत अजून तरी कोणताच खुलासा आयोजन समिती किंवा ए. आर. रेहमाननं केलेला नाही. मात्र, हे एक पंजाबी गाणं असेल. रेहमानचं गाणं फक्त लंडन वासियांच्याच नाही जगभरातील लोकांच्या ओठांवर नंतर कित्येक दिवस असेल यात शकां नाही. या गाण्याशी इंग्लंडमधील भारतीयांच्या भावना जुळलेल्या असतील आणि कॉमनवेल्थमध्ये सादर केलेल्या गाण्याप्रमाणेच रेहमानच हेही गाणं सर्वांवर मोहिनी घालेन.
इतकचं नाही तर या स्पेशल गाण्यानंतर ८०च्या दशकातील कमल हसनच्या राम लक्ष्मण या चित्रपटातलील ती सुंदर धूनही ऐकू येईल ज्याला इलयाराजायांनी संगीतबद्ध केलं होतं... यानंतर सर्वांच्या नजरा लागतील त्या सुशील कुमारवर... जेव्हा तो भारताचा तिरंगा घेऊन भारताच्या ऑलिम्पिक टीमचं नेतृत्व करेल...
लंडन ऑलिम्पिकचा भारतीय रंग इतक्यावरच थांबणार नाही... भारताचे बरेच कलाकार या ओपनिंग सेरेमनीमध्ये आपला कलाविष्कार दाखवतील. दक्षिण भारताचे एकूण ७२ कलाकार जगासमोर कथ्थक आणि भरतनाट्यम सादर करतील तर पंजाबीही आपला जलवा दाखवण्यास आतूर असतील... पंजाबची २८ मुले भांगड्याच्या तालावर संपूर्ण जगाला नाचवतील. त्यामुळेच या सोहळ्याच्या यशात भारतीयांचा सहभागही तितकाच महत्वाचा ठरणार आहे.
.