समीकरण... लग्नाचं आणि आत्महत्येचं
जर तुम्हाला असं वाटत असेल की, पतीपासून विभक्त झालेल्या, विधवा किंवा एकट्या राहणाऱ्या महिला आत्महत्येच्या मार्गावर असतात, तर तुम्ही साफ चुकीचे आहात. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय गुन्हेगारी अहवालानुसार, अशा महिलांचं प्रमाण हे विवाहित महिलांच्या प्रमाणापेक्षा कित्येक पटीनं कमी आहे.
Jul 5, 2012, 01:00 PM ISTहुंड्यासाठी छळ, नवविवाहितेची आत्महत्या
डोंबिवलीत उच्च शिक्षित नवविवाहितेनं हुंड्यासाठी होणा-या छळाला कंटाळून आत्महत्या केली. जेट एअरवेजमध्ये एअर होस्टेस असलेल्या वृशाली गावडे या २९ वर्षीय विवाहितेनं घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
Jun 20, 2012, 09:07 AM ISTवरळी सी लिंकवरून आत्महत्येचा प्रयत्न
मुंबईच्या वरळी सी लिंकवरुन उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या एका तरुणीला एका पोलीस शिपायानं वाचवलं. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घ़डली.
May 19, 2012, 03:53 PM ISTआत्महत्येसाठी हवीय राष्ट्रपतींची परवानगी
लखनऊमधील फत्तेपूर येथे एक अजब प्रकार पुढे आला आहे. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे हा गुन्हा आहे. त्यावर एका पोलीस हवालदारांने राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनाच साकडे घातले आहे.वरिष्ठांकडून छळ होत असल्याने जीवनाला कंटाळलेल्या पोलीस हवालदाराला आत्महत्या करायची आहे, तसे त्यांने राष्ट्रपतीनाच पत्र लिहिले आहे.
May 4, 2012, 12:54 PM ISTमुलींची हत्या करून आईची आत्महत्या
नवी मुंबईतील खारघरमधील अधिराज सोसायटीमध्ये आईनेच आपल्या पोटच्या दोन मुलींची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब तिसऱ्या दिवशी उघडकीस, आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Apr 21, 2012, 05:03 PM ISTदाम्पत्याची तीन मुलींसह आत्महत्या
वाढती महागाई, घाट्यातली शेती आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून एका दाम्पत्यानं तीन मुलींसह जीवनच संपवण्याचा प्रयत्न केल्याची ह्रदयद्रावक घटना सांगली जिल्ह्यात घडलीय.... पोटच्या पोरांना विष पाजण्यापर्यंत हतबल झालेल्या या दाम्पत्याच्या कृत्यानं शेतक-याची दयनिय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे.
Apr 11, 2012, 12:42 PM ISTफेसबुकवर चॅट करताना महिलेची आत्महत्या
तैवानमध्ये एका महिलेने आपल्या मित्रमंडळीशी फेसबुकवर चॅट करत असताना विषारी द्राव ओढत आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या महिलेच्या मित्रमंडळींनी पोलिसांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही.क्लेअर लिनने आपल्या ३१व्या वाढदिवसाच्या दिवशी १८ मार्चला आत्महत्या केली. क्लेअर लिनच्या कुटुंबातील सदस्यांना तिच्या फेसबुकवरील संभाषणाविषयी कोणतही कल्पना नसल्याचे तैपईचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
Mar 28, 2012, 10:25 AM ISTघरकुल घोटाळा प्रकरणातील एकाची आत्महत्या
जळगावातल्या २९ कोटी ५९ लाख रुपयांच्या घरकुल घोटाळाप्रकरणी पोलीस चौकशीला सामोरं गेलेल्या माजी पंचायत समिती सदस्याने आत्महत्या केली आहे. रामकृष्ण शिवराम सपकाळे असं त्याचं नाव आहे.
Mar 17, 2012, 08:48 AM ISTठाण्यात दोन जोडप्यांची आत्महत्या
ठाण्यातल्या ओवळा गावामध्ये दोन जोडप्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हे दोन युवक आणि दोन युवती छत्तीसगडचे रहिवासी होते.
Mar 15, 2012, 09:34 AM ISTपत्नीचे अपहरण, किणेंचा आत्महत्येचा इशारा
ठाण्यात आज महापौरपदाची निवडणूक होत आहे. यातच अपहरणानाट्यामुळं गाजलेल्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बंडखोर आणि मनसेच्या भूमिकेकडं लक्ष लागले असताना भाजप नगसेविकेच्या अपहरणनाट्याची घटना ताजी असताना काँग्रेसच्या नगरसेविका बेपत्ता झाल्याने राजकारण तापले आहे. दरम्यान, ठाण्यातील काँग्रेसचे नगरसेवक राजन किणे यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.
Mar 6, 2012, 01:12 PM ISTशिर्डीत हॉटेलमध्ये दाम्पत्याची आत्महत्या
बँकेच्या कर्जाला कंटाळून एका जोडप्यानं गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार शिर्डीतल्या हॉटेल साई धनप्रतापमध्ये उघड झालाय. राजेंद्र आणि अर्जना निम्बेकर असं या दाम्पत्याचं नाव आहे.
Jan 7, 2012, 12:08 PM ISTगरीबिपुढे शेतकऱ्यांने टेकले हात
मुलीच्या उच्चशिक्षणासाठी सनदशीर मार्गानं प्रयत्न करुनही बँका शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देत नसल्यानं हतबल झालेल्या एका शेतक-यानं औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयताच आत्महत्येचा प्रयत्न केला.
Dec 17, 2011, 11:27 AM ISTलातूरमध्ये हॉटेलियरचा गूढ मृत्यू
लातूरमध्ये हॉटेल व्यावसायिक विजय मणियार यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र, त्यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाल्याची शंका वर्तवण्यात येतेय.
Dec 5, 2011, 03:55 AM ISTउदास सरकार शेतकरी बेजार, आत्महत्या वारंवार
विदर्भात शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं. गेल्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संख्येत वाढ झाली. अकोला जिल्ह्यातल्या पाळोदी इथल्या एका कापूस उत्पादक शेतकऱ्यानं काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली.
Nov 13, 2011, 06:41 AM ISTपरिस्थिला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
यवतमाळ जिल्ह्यातल्या जळका गावच्या कलावती बांदुरकर यांच्या विवाहित मुलीनं बिकट आर्थिक स्थितीमुळं कंटाळून आत्महत्या केलीय.
Oct 20, 2011, 08:13 AM IST