st

ऊस आंदोलन चिघळलं, एसटी सेवा पुन्हा बंद

ऊसदर आंदोलनामुळं पश्चिम महाराष्ट्रात सकाळी सुरु करण्यात आलेली एसटी सेवा पुन्हा बंद करण्यात आलीये. आंदोलनामुळं सांगली एसटी सेवा पुन्हा बंद करण्यात आलीये. सांगली-इस्लामपूर मार्गावर रास्ता रोको करण्यात आला.

Nov 14, 2012, 05:45 PM IST

साताऱ्यात पोलिसांवर दगडफेक, तीन एसटी फोडल्या

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कालच्या आंदोलनाची धग आजही कायम आहे. आज शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साता-यात आंदोलन केलं. पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली तर साता-यातल्या शिवथरजवळ कार्यकर्त्यांनी तीन एसटी फोडल्या. दरम्यान, आंदोलकांच्या मृत्यूंच्या निषेधार्थ इंदापूर बंद पुकारण्यात आलाय.

Nov 13, 2012, 01:45 PM IST

आजपासून बस प्रवास महागणार

नवी मुंबई परिवहन सेवेनं आजपासून भाडेवाढ लागू केलीय. एन.एम. एम.टी ला दर महिन्याला 1 कोटी 47 लाखांचा तोटा होतोय. हा तोटा भरण्यासाठी, तसंच डिझेलचे दर वाढल्याने ही भाडेवाढ केली असल्याचं परिवहन तर्फे सांगण्यात येतंय.

Sep 25, 2012, 03:52 PM IST

गरिबांचा प्रवासही महागणार!

केंद्र सरकारनं डिझेल दरात प्रति लिटर तब्बल पाच रूपयांची वाढ केल्यानं एसटीच्या इंधन खर्चात दररोज ६० लाख रूपयांची वाढ झालीय. त्यामुळे एसटीलाही लवकरच मोठी दरवाढ करावी लागणार आहे.

Sep 14, 2012, 09:44 AM IST

एसटीमध्ये मेगाभरती, इथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत एसटीच्या काळातील ही मेगाभरती आहे. चालक (कनिष्ठ), वाहक (कनिष्ठ), लिपिक-टंकलेखक (कनिष्ठ) आणि सहाय्यक (कनिष्ठ) या पदांकरिता ही भरती आहे.

Aug 7, 2012, 12:31 PM IST

खिशावर एसटीचा डल्ला

एसटीला दररोज लाखो रूपयांचा तोटा होत असल्याचे कारण पुढे करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशावर एसटी पुन्हा डल्ला मारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही भाडेवाढ ४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. ही भाडेवाढ ६.२५ टक्के इतकी असणार आहे.

Aug 5, 2012, 03:02 PM IST

७ रुपयांत जेवा, ५ रुपयांत कपडे शिवा!

सध्याच्या काळात महागाईनं एव्हरेस्ट गाठलं असताना राज्य सरकार एसटीच्या वाहक चालकांना 5 रुपयांत ड्रेस शिवून घ्या तसंच 7 रुपयांत भरपेट जेवा असं सांगतंय. ड्रेस शिलाई भत्ता 5 रुपये 6 पैसे आणि भोजन भत्ता 7 रुपये हे ऐकून धक्का बसेल पण हे वास्तव आहे.

Jul 16, 2012, 12:12 AM IST

बस ड्रायव्हरला मारहाण

बसला कारचा धक्का लागल्यानं कारचालकासह चौघांनी बसचालक वामन अहिरेंना गाडीतून ओढून बेदम मारहाण केली. यावेळी बसमधील एकही प्रवासी अहिरे यांच्या मदतीला धावला नाही.

Feb 27, 2012, 07:58 AM IST

पुण्यात माथेफिरूनं ७ जणांना चिरडलं

स्वारगेट बस टेपोतून एका माथेफिरूने एसटी पळविली. तो एवढ्यावर न थांबता त्याने १० तो १२ जणांना चिरडले. या प्रकारामुळे पुणे शहर हादरले आहे. निलायम सिनेमाजवळ पोलिसांनी एसटी अडवली. मात्र, त्यापूर्वी त्यांने एसटीने २२ जणांना उडविले.

Jan 25, 2012, 02:52 PM IST

कापूस आंदोलन पेटलं, एसटी टार्गेट

कापूस दरवाढीसाठी आंदोलनाची धग कायम आहे. विदर्भात हे आंदोलन चांगलचं पेटलय. संतप्त आंदोलकांनी एसटीला टार्गेट केलं आहे.

Nov 16, 2011, 02:50 AM IST