shivaji park

राज यांना शिवाजी पार्क सभेची परवानगी नाही

शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला परवानगी नाकारण्यात आली आहे. पण कुठल्याही परिस्थितीत शिवाजी पार्कवरच्या रस्त्यावर सभा घेणारच, असं आव्हान राज यांनी दिले आहे.

Feb 3, 2012, 08:43 PM IST

मग झक मारायला निवडणुका घेतात – राज

निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांना शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी एका दिवसाची परवानगी देणार नसतील तर काय झक मारायला घ्यायच्या निवडणुका. बंद करून टाका या निवडणुका, अशी उद्विग्न प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केली. शिवाजी पार्कवर सभा घेण्याची मनसेला परवानगी नाकारल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.

Feb 3, 2012, 07:00 PM IST

शिवसेनेतील बंडखोर

एकेकाळी शिवसेनेत बंडाला स्थान नव्हतं. पण आता शिवसेनेलाही आता बंडखोरीची लागण झाली आहे. बंडखोरी रोखण्यासाठी शिवसेनेनं उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एबी फॉर्मचं वाटप करण्याची रणनीती आवलंबली होती. पण काही ठिकाणी बंडखोरी झालीच.

Feb 1, 2012, 10:26 PM IST

ठाकरे X ठाकरे एकाच दिवशी धडाडणार?

१३ फेब्रुवारीला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची सभा घेण्यासाठी मनसे प्रयत्नशील आहे. कारण याच दिवशी MMRDA मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची तोफही धडाडणार आहे.

Jan 19, 2012, 11:36 AM IST

शिवाजी पार्कवर अवतरली 'शिवशाही'

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे दिग्दर्शित 'जाणता राजा' हे महानाट्य पुन्हा एकदा बघण्याची संधी मुंबईकरांना मिळालीय.२० ते २५ डिसेंबरदरम्यान या महानाट्याचं आयोजन शिवाजी पार्कमध्ये करण्यात आलंय.

Dec 22, 2011, 08:14 AM IST

कॉर्पोरेट कबड्डी स्पर्धेत ONGC ची पोरंss हुशार..

चौथ्या कॉर्पोरेट कबड्डी स्पर्धेत ONGC टीमनं विजय पटकावून हॅट्ट्रिक साधली. ONGC टीमनं एअर इंडिया टीमला ३२-२१ अशा फरकानं हरवलं. या स्पर्धेमध्ये २६ टीम्सनी सहभाग घेतला होता.

Nov 28, 2011, 12:25 PM IST

वाघाच्या डरकाळीने केले ध्वनी प्रदूषण!

शिवाजीपार्क पोलिसांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या आयोजकांविरोधात ध्वनी प्रदूषणाचा गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी रात्री उशीरा हा गुन्हा दाखल करण्यात आला.

Oct 7, 2011, 08:31 AM IST

सेनेच्या वाघाची डरकाळी 50 डेसिबल्सची

शिवाजी पार्क शांतता क्षेत्रात येत असल्यामुळे येथे जाहीर सभा घेण्यास मुंबई महापालिका मनाई केली होती. त्यामुळे शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी दसरा मेळावा घेण्यासाठी न्यायालयात याचिका केली होती. मुख्य न्या. मोहित शहा व न्या. रोशन दळवी यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली.

Oct 2, 2011, 12:27 PM IST