rail roko

वाशिंदमधील रेलरोको मागे, आंदोलक प्रवाशांना हटवलं

गेल्या तीन दिवसांपासून टिटवाळा ते आसनगाव लोकलसेवा बंद आहे. या विरोधात संतापलेल्या प्रवाशांनी रेल रोको आंदोलन केलं. आता वाशिंद रेल्वे स्थानकावरील रेलरोको मागे घेण्यात आला आहे.

Sep 1, 2017, 11:39 AM IST

रेल रोको केलेल्या २०० जणांवर गुन्हा दाखल

कोपर - डोंबिवली स्टेशन दरम्यान रेल रोको केलेल्या २०० जणांवर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  रेल्वे अधिकाऱ्यांनी कारवाईची नोटीस बजावण्यात आल्यानंतर कोपर स्थानकाजवळील झोपडपट्टीवासियांनी रेल रोको केला होता. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.

Jan 12, 2017, 08:31 PM IST

डोंबिवलीत अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याने रेल रोको

डोंबिवली रेल्वे रुळ लगत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत असल्याने येथील लोकांनी रेलरोको केला आहे.

Jan 12, 2017, 12:52 PM IST

संतप्त प्रवाशांचा बदलापूरमध्ये रेलरोको

मध्य रेल्वे मार्गावर वारंवार होणाऱ्या समस्येमुळे बेजार झालेल्या संतप्त प्रवाशांनी बदलापूर स्थानकावर रेलरोको केला. 

Aug 12, 2016, 08:39 AM IST

डोंबिवलीतील महिलांकडून रेलरोको आंदोलन

डोंबिवलीतील महिलांकडून रेलरोको आंदोलन

Nov 19, 2014, 02:17 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचं `रेल रको`

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज हार्बर मार्गावर बेलापूर स्टेशनजवळ रेल रोको आंदोलन केलं. रेल्वे स्थानकावरच्या गैरसोयींबाबत हे आंदोलन करण्यात आलं.

Jun 18, 2013, 09:00 PM IST

जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुकारलेल्या रेल रोको आंदोलनप्रकरणी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांच्यासह ६८ जणांवर कळवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

Sep 5, 2012, 05:45 PM IST

ठाण्याजवळ आव्हाडांचा रेलरोको; प्रवासी वेठीला

ठाणे ते कळवादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सकाळीच ‘रेले रोको’ आंदोलन केलंय. मफतलाल झोपडपट्टी वाचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय.

Sep 5, 2012, 09:43 AM IST

आरपीआय करणार आज रेलरोको

डॉक्टर बाबासाहेब आंबोडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला इंदू मिलची सर्व साडे बारा एकर जागा मिळावी यासाठी रिपब्लीकन पक्षाचे कार्यकर्ते आज रेलरोको करणार आहेत. डोंबिवलीत रेल्वे स्थानकात सकाळी ११ वाजता रिपाइं कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत.

Dec 19, 2011, 04:01 AM IST