pulses

एकीकडे महागाईचा भडका, ३५० क्विंटल तूरडाळ चोरीला

सध्या सणासुदीचे दिवस असून महागाई गगनाला भिडली आहे. तूर डाळीच्या किंमतही गगनाला भिडत असताना, आता तूरडाळ चोरीचे प्रकारही होऊ लागलेत. नागपूरात तब्बल ३५० क्विंटल डाळ चोरीला गेली. 

Oct 20, 2015, 09:01 AM IST

महागाईचा कहर, २ हजार मेट्रिकटन डाळीची आयात करणार

देशात डाळींच्या उत्पादनानं यंदा नीचांकी पातळी गाठल्यानं भाव गगनाला भिडलेत. यंदा सरकारला जवळपास पन्नास लाख मेट्रिक टन डाळ आयात करावी लागेल असा अंदाज वर्तवण्यात येतयोय. झी मीडियाचं सहकारी वृत्तपत्र डीएनएनं दिलेल्या वृत्तानुसार याचा सर्वाधिक फायदा टांझानिया, ऑस्ट्रेलिया आणि म्यानमार या तीन देशांना होणार आहे. केंद्र सरकारनं डाळीचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी कालच २ हजार मेट्रिकटन अतिरिक्त आयातीला मंजुरी दिलीय.

Oct 7, 2015, 06:47 PM IST

महागाईचा कहर, तुरडाळ १५० रुपये किलो

 महागाई नियंत्रणात आणल्याचे सरकारी दावे होत असले तरी त्या दाव्यात कितपत तथ्य आहे हे कडधान्याच्या किंमतींवरून सहज लक्षात येईल. मागचे सर्व विक्रम मोडीत काढत नागपूरमध्ये तूरडाळीने 150 रूपये किलोचा पल्ला गाठलाय. त्यामुळे तूरडाळीत भेसळ होत असल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

Sep 15, 2015, 03:39 PM IST

भाजीपाला, कांद्यानंतर डाळीच्या दरात ३० ते ४० टक्यांपर्यंत वाढ

पावसाने दडी मारल्याने याचा चांगलाच फटका जीवनावश्यक वस्तूंवर बसल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम भाजीपाला, कांदा आणि आता डाळीच्या उत्पादनावर झाला आहे. उत्पादन घटल्याने डाळीच्या दरात ३० ते ४० टक्यांपर्यंत वाढ झाली आहे. 

Aug 21, 2015, 09:39 AM IST