राष्ट्रपती भवनासमोर महिलेचा निर्वस्त्र होण्याचा प्रयत्न
दिल्लीत राष्ट्रपती भवनासमोर भर दिवसा चौकात एक पुरूष आणि एका महिलेने निर्वस्त्र होण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान कार्यालयातही घुसण्याचा या महिला आणि पुरूषाने प्रयत्न केला.
Feb 3, 2014, 04:35 PM ISTआजीनं हाणून पाडला नातीचा बालविवाह!
समाज बदलला असं आपण कितीही म्हटलं तरी आजही अशा काही घटना घडत आहेत. ज्यामुळं आपण खरंच पुरोगामी आहोत का असा प्रश्न पडतो? पिंपरी-चिंचवड जवळ सोमाटणे फाटा इथं असाच समाजाचा मागासलेपणा दाखवणारी घटना घडलीय. इथं एका अल्पवयीन मुलीचा विवाह होत होता. पण मुलीच्या सुदैवानं आजीच्या सतर्कतेमुळं आणि मुलीच्या धाडसानं तो टळला.
Dec 28, 2013, 10:14 PM ISTड्रायव्हिंगसाठी सौदी अरेबियात महिलांचं आंदोलन
आपल्यालाही पुरुषांप्रमाणेच ड्रायव्हिंगचा हक्क मिळावा, यासाठी सौदी अरेबियाच्या महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. सौदी अरेबियात महिलांच्या ड्रायव्हिंगवर बंदी असल्यामुळे त्याविरोधात हे आंदोलन छेडण्यात आलं आहे.
Oct 27, 2013, 05:30 PM IST`भगतसिंगांच्या चरित्राचं प्रकाशन मोदींच्या हस्ते होऊ देणार नाही!`
क्रांतिकारक भगतसिंग यांचं चरित्र प्रकाशित होत असून या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र, पुस्तकाच्या लेखकाने आणि प्रकाशकांसह काही नागरिकांनी या गोष्टीला विरोध दर्शवला आहे.
Oct 15, 2013, 03:11 PM ISTइजिप्तमधील सत्ता संघर्ष?
इजिप्तमधील क्रांती निष्फळ?, दोन वर्षांत दोनदा क्रांती. इजिप्तमध्ये झाला उठाव. लाखो लोक उतरले रस्त्यावर. सर्वांची एकच मागण, प्रेसीडेंट मोर्सी, सोडा खुर्ची. प्रेसीडेंट मोर्सीला सैन्यानं घेतलं ताब्यात. इजिप्तमध्ये पुन्हा बदलला राजा.पुन्हा झाला तख्तपलट. काय आहे इजिप्तमधील सत्ता संघर्ष?
Jul 5, 2013, 11:35 AM ISTइजिप्तचे राष्ट्राध्यक्ष मोर्सी यांची हकालपट्टी
इजिप्त पुन्हा ‘पॉईंट झिरो’वर येऊन पोहचलंय. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांची हकालपट्टी करण्यात आलीय. त्यानंतर लष्कारानं मध्यस्थी करत एकप्रकारे सराकारवर वर्चस्वच मिळवलंय.
Jul 4, 2013, 07:41 AM ISTLBT संपाविरोधात व्यापाऱ्यांना मनसेचा इशारा...
एलबीटीचा मुद्दा आता जास्तच चिघळत चालला आहे. आणि त्यावर मनसेनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी याआधीही व्यापाऱ्यांना इशारा दिला होता.
May 9, 2013, 01:03 PM ISTव्यापाऱ्यांचा बंद, मुंबईत काळा बाजार सुरू...
एलबीटीविरोधात व्यापाऱ्यांच्या बंदचे परिणाम आता मुंबईत दिसू लागले आहेत. मुंबईत जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार सुरु झाला आहे.
May 9, 2013, 10:39 AM ISTठाणे बंदला हिंसक वळण, नेत्यांची जबरदस्ती
अनधिकृत बांधकामावरील कारवाईच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या ठाणे बंदला मध्यरात्रीपासून सुरुवात झाली आहे.
Apr 18, 2013, 08:05 AM ISTशरद पवारांची प्राध्यापकांसाठी मध्यस्थी
प्राध्यापकांची कैफीयत शरद पवार केंद्र सरकारकडे मांडणारयत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी आज पवारांची भेट घेतली आणि प्राध्यापकांच्या संपाबाबत त्यांना माहिती दिली.
Mar 30, 2013, 10:41 PM ISTपरशुरामाचे चित्र, संभाजी बिग्रेडचा संमेलानाला विरोध
चिपळूण साहित्य संमेलन पुन्हा एकदा नव्या वादात अडकलं आहे.. परशुरामाच्या चित्रावरुन हा वाद रंगू लागला आहे.
Jan 5, 2013, 05:42 PM ISTरेपविरोधात विद्यार्थिनींच्या हाती हॉकी स्टिक
दिल्लीतील गँगरेप प्रकरणी सुरु असलेल्या निषेधाचे पडसाद नाशिकमध्ये उमटले. नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर विद्यार्थिनीनी मोर्चा काढून आता सहन करणार नाही असा इशाराच सरकार आणि मुलींची छेड काढणा-यांना दिला.
Dec 25, 2012, 11:39 PM ISTगँगरेप प्रकरण : आंदोलकांवर लाठीचार्ज, `तिला` न्याय मिळणार?
देशभरात उद्रेक पसरला आहे. कोणताही नेता नाही किंवा सामाजिक कार्यकर्ताही नाही. तरी सारे एकवटले आहेत... `तिला` न्याय देण्यासाठी.
Dec 22, 2012, 12:28 PM IST`पुणेकरांना आलाय माज`, झुरमुरेंनी काढली लाज
पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. एका कार्यक्रमात त्यांनी "पुणेकर माजल्याचं" वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करत भाजप, सेना आणि मनसेच्या सदस्यांनी महापालिकेत गोंधळ घातला.
Dec 17, 2012, 06:47 PM ISTनगरसेवकांनी काढली अधिकाऱ्याची अंत्ययात्रा!
कोल्हापूरकर गेल्या अनेक वर्षात पाणी टंचाईला तोंड देत आहेत. त्यासाठी महापालिकेच्या वतीने मंत्रालयात थेट पाईप लाईन योजना सादर केली गेली. पण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी या योजनेला विरोध केलाय. याचा निषेध म्हणुन महापालिकेच्या सर्व पक्षीय नगरसेवकांनी मंत्रालयातल्या अधिका-यांची अंत्ययात्रा काढली.
Nov 30, 2012, 10:15 PM IST