political news in marathi

भाजपमध्ये गेल्याने, आपल्याच माणसांनी मशिदीत नमाज पठणास रोखलं...

  त्रिपुरामध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत एका गावात समर्थकांमध्ये विभाजन झाले आहे. त्यात भाजपला समर्थन करणाऱ्या व्यक्तींना मशिदीत नमाज पठण करण्यास रोखले. 

Feb 13, 2018, 04:13 PM IST

Video : सेहवागने आजही काढली शोएब अख्तरची पिसे... पण...

स्वीत्झरलँडच्या सेंट मोरिट्समध्ये आईस क्रिकेटचा दुसरा सामना अपेक्षेनुसार रोमांचक राहिला. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने पाकिस्तानी गोलंदाजांना धू-धू धुतले. परंतु,  धडाकेबाज फलंदाजी करूनही त्यांचा संघ जिंकू शकला नाही. हा सामना पहिल्या सामन्याचा रिप्ले झाला. 

Feb 9, 2018, 10:48 PM IST

अखेर माधुरीला मराठीत ‘मुहूर्त’ मिळाला !

  माधुरी दीक्षित मराठी सिनेमा कधी करणार ? मराठमोळ्या माधुरीला मराठी सिनेमाचं एवढं वावडं का ? बॉलिवूड गाजविणारी धकधक गर्ल मराठी सिनेमा का करत नाही ? असे एक ना अनेक प्रश्न गेली वर्षानुवर्ष विचारले जात आहेत. अखेर माधुरीला मराठी सिनेमाचा मुहूर्त मिळालाय. 'बकेट लिस्ट' या तेजस देऊस्कर दिग्दर्शित मराठी सिनेमात माधुरी दीक्षित काम करतेय. 

Feb 9, 2018, 08:29 PM IST

मॅच खेळायला नाही आला जखमी विजय, बोर्डाने केले टीमच्या बाहेर

भारतीय टेस्ट संघाचा सलामी फलंदाज मुरली विजयला तमिळनाडूच्या वन डे संघातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. आता तो विजय हजारे स्पर्धेच्या इतर सामन्यात खेळू शकणार नाही. विजयला टीम बाहेर करण्यामागे कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे. 

Feb 9, 2018, 07:42 PM IST

Video - वीरूने पाकिस्तानी गोलंदाजांना धू-धू धुतले, पण झाले असे काही...

स्वीत्झरलँडच्या सेंट मोरिट्समध्ये आईस क्रिकेटचा पहिला सामना अपेक्षेनुसार रोमांचक राहिला. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने पाकिस्तानी गोलंदाजांना धू-धू धुतले. परंतु,  धडाकेबाज फलंदाजी करूनही त्यांचा संघ जिंकू शकला नाही. 

Feb 8, 2018, 10:55 PM IST

रबाडाची एक शिवी आणि विराटने १५ सेकंदात सेट केला मॅचचा निकाल

  विराटला दिलेली शिवी कशी सुसाईडची गोळी ठरू शकते याचा अंदाज दक्षिण आफ्रिकेला केपटाऊन वन डेमध्ये आला असेल. मॅचचा हिरो विराट कोहलीला बनला तर व्हिलन बनला रबाडा... याच्या अति जोशाने आफ्रिका संघाचे होश उडविले. 

Feb 8, 2018, 09:31 PM IST

Video : विराट कर्णधार पण आदेश देतो धोनी... कालच्या सामन्याचा video viral

  पेपरवर जरी विराट कोहली हा भारताचा कर्णधार असला तरी सामन्यात विकेटकीपर महेंद्र सिंग धोनीच पकड ठेवून असतो.  याचा खुलासा करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Feb 8, 2018, 03:52 PM IST

रेणुका चौधरी पंतप्रधान मोदींवर संतापल्या, माझ्यावर केली वैयक्तिक टीका

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत आपल्या भाषणात काँग्रेसच्या रेणुका चौधरी यांना हसण्यावरून तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, रामायण मालिका संपल्यानंतर पहिल्यांदा असे हसणे ऐकले आहे. 

Feb 7, 2018, 09:10 PM IST

INDvsSA : आफ्रिकेच्या धरतीवर शतक लगावून स्मृतीने रचला इतिहास....

   भारतीय क्रिकेट संघ  परदेशी जमिनीवर धमाल कामगिरी करत आहे. आफ्रिकेविरूद्ध पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही आपला फॉर्म कायम राखला आहे.  आफ्रिकातील किंबर्ले येथील दुसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.  सुरवातीला वाटले की  टीम इंडिया मोठा स्कोअर करणार ननाही. पण सलामीवीर स्मृती मानधनाच्या शानदार शतकाच्या जोरावर भारतीय संघाने ३०० च्या पार आकडा नेला आणि या सामन्यात स्मृतीने आपल्या नावावर विक्रमही केला. 

Feb 7, 2018, 08:23 PM IST

महाराष्ट्र श्रीच्या थराराला रॉयल पुरस्कार

  महाराष्ट्राच्या शरीरसौष्ठवाची शान, मान आणि अभिमान असलेल्या महाराष्ट्र श्री या प्रतिष्ठीत स्पर्धेला यंदा रॉयल स्टेटस लाभले आहे. येत्या 24 आणि 25 फेब्रूवारीला मुंबईस्थित वांद्रे येथे होणाऱया या राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेच्या भव्य आणि दिव्य आयोजनाचं शिवधनुष्य अभिनव फाऊंडेशनचे सर्वेसर्वा आणि माजी नगरसेवक क्रीडाप्रेमी महेश पारकर यांनी पेललं असून किताब विजेत्याला दीड लाखांच्या रोख पुरस्कारासह स्टेटस सिंबॉल असलेली रॉयल एनफिल्ड देऊन गौरविले जाणार आहे. त्यामुळे 14 व्या महाराष्ट्र श्री स्पर्धेत पीळदार कामगिरी करण्यासाठी अवघं महाराष्ट्र घाम गाळतोय. त्याचबरोबर तिसरी फिजीक स्पोर्टस् अजिंक्यपद स्पर्धाही रंगणार आहे.

Feb 5, 2018, 08:41 PM IST

राज ठाकरेंचा भुजबळ छोडोचा कानमंत्र

  बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या सुटकेसाठी समर्थकांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. 'आता भुजबळ छोडो चळवळीची गरज असल्याचा सल्ला ठाकरेंनी भुजबळ समर्थकांना दिला. 

Feb 5, 2018, 08:19 PM IST

पतंजली बिस्किटांमध्ये सापडला मैदा, गुन्हा दाखल

पतंजलीच्या विविध प्रॉडक्टची सध्या भारतीयांमध्ये खूप क्रेज निर्माण झाली आहे. पतंजलीवर लोकांचा विश्वास वाढला आहे. अशातच पतंजलीसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे.  पतंजली मैदा विरहित बिस्किटे असल्याची जाहीरात करीत असताना त्यात मैदा आढळून आल्याने पतंजली उद्योगाचे प्रमुख रामदेव बाबा यांच्याविरोधात राजस्थानात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Feb 2, 2018, 07:35 PM IST