pimpari chinchwad corporation

अजित दादांची माघार, बंडखोर अधिकृत

पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षण मंडळाच्या निवडणुकांच्या निमित्तानं सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधली अंतर्गत दुफळी पुन्हा एकदा उघड झालीय. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांवर माघार घेण्याची नामुष्की तर ओढवलीच पण बंडखोरांना अधिकृत करण्याची वेळही राष्ट्रवादीवर आली. ही अजितदादा पवारांची हार असल्याचे मानले जात आहे.

May 2, 2012, 09:39 AM IST

राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारण शिगेला

पिंपरी चिंचवडमध्ये स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण शिगेला पोहचलंय. अजितदादांचे निकटवर्तीय जगदीश शेट्टी यांचं नाव जवळपास निश्चित झालय असं असताना पिंपरी-चिंचवडमधल्या तिनही आमदारांनी जगदीश शेट्टी यांच्या विरोधात मोर्चे बांधणी केल्यानं चित्र बदलल आहे.

Apr 5, 2012, 07:10 PM IST

अजित पवारांनी खाल्ली पलटी

पिपंरी चिंचवडच्या उपमहापौरपदावर केलेली सुमन नेटकेंची निवड रद्द करत अजित पवारांनी राजू मिसाळ यांना संधी दिली आहे. अजित पवार यांनी अचानक पलटी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चा आहे, दादा का घाबरले?

Mar 9, 2012, 06:27 PM IST

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

पुणे येथील पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालीय. पहिल्या यादीत ४५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलीय.

Feb 7, 2012, 08:54 PM IST