nitish kumar

नितीश कुमार आणि मोदींना तुरूंगात टाकल्याशिवय गप्प बसणार नाही

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भागलपूर येथील घोटाळ्याची नितीश कुमार यांना संपूर्ण माहिती होती, असा आरोप करत नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना या प्रकरणात तुरूंगात टाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे लालूंनी म्हटले आहे.

Sep 12, 2017, 07:41 PM IST

लालूंची भागलपूर रॅली म्हणजे नौटंकी : नितीश

बिहारमधील भागलपूर येथे राष्ट्रीय जनता दलाने आयोजित केलेली रॅली म्हणजे केवळ नैटंकी असल्याचा टोला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लगावला आहे.

Sep 11, 2017, 09:50 PM IST

नितीश कुमार यांनी लालूंना म्हटले 'डार्लिंग'

महाआघाडी सोडून नितीश कुमार यांनी भाजपशी नवा दोस्ताना केला. त्यानंतर बिहारमधले राजकारण नव्या वळणावर येऊन ठेपले आहे. जनता दलाचे लालू प्रसाद यादव आणि जनता दल युनायटेडचे नितीश कुमार यांच्यात तर, खास बिहारी स्टाईल कलगीतुरा रंगला आहे. हा कलगीतुरा इतका मनोरंजक ठराला आहे की, एका टीकेला प्रत्युत्तर देताना नितीश यांनी लालू प्रसाद यादव यांना चक्क 'डार्लिंग' म्हटले आहे.

Sep 5, 2017, 09:42 AM IST

भाजप.. तुझा नितीशवर भरवसा नाय का? : लालूप्रसाद

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर विरोधकांनी नरेंद्र मोदी यांच्यावरील टीकेचा रोख वाढवला आहे. सर्व विरोधक मोदींवर तुटून पडले असताना बिहारमधून लालू प्रसाद यादव यांनी मात्र त्यांचे जुने सवंगडी नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपचा नितीश यांच्यावर विश्वास नाही, असे लालूंनी म्हटले आहे.

Sep 3, 2017, 09:15 PM IST

फेरबदल कोणतीही माहिती नाही - नीतीश कुमार

मोदी कॅबिनेटमध्ये रविवारी होणाऱ्या संभाव्या कॅबिनेट फेरबदलाबाबत आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही, अशी प्रतिक्रिया नीतीश कुमार यांनी दिलीय. 

Sep 2, 2017, 08:49 PM IST

... शरद यादव यांची राज्यसभेची खासदारकीही धोक्यात?

जनता दलाचे माजी अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते शरद यादव यांची राज्यसभेतील खासदारकी सध्या बिहारच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. 

Aug 16, 2017, 10:30 PM IST

बिहारमध्ये महापूर 56 जणांचा मृत्यू

बिहारमध्ये आलेल्या महापूराने आतापर्यंत 56 जणांचा बळी घेतल्याचे वृत्त आहे. अद्यापही पूरपरिस्थिती कायम असून, मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Aug 15, 2017, 06:35 PM IST

नितीश कुमार यांनी केली २१ नेत्यांची हकालपट्टी

नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत भाजपशी घरोबा करत सत्ता स्थापन केली. मात्र, नितीश यांचा निर्णय अनेकांना रुचला नाही. ज्यांनी विरोध केला त्यांना थेट पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आलाय. यात २१ नेत्यांचा समावेश आहे.

Aug 14, 2017, 07:30 PM IST

एनडीए आणि केंद्र सरकारमध्ये सहभागी होणार जेडीयू

जेडीयू एनडीएमध्ये सहभागी होण्याची औपचारिक घोषणा पटनामध्ये आयोजित राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत करणार असल्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शुक्रवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घत त्यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं होतं.

Aug 13, 2017, 10:21 AM IST

जनता दल (यु) फुटीच्या उंबरठ्यावर; शरद यादव यांना राज्यसभेच्या नेतेपदावरून हटवले

लालू प्रसाद यादव यांच्यासोबतची आघाडी तोडण्याचा निर्णय घेतल्यावर नितीश कुमार यांनी पक्षांतर्गतही मोठा निर्णय घेतला आहे. 

Aug 12, 2017, 07:24 PM IST

मोदी, शहांची भेट घेतल्यावर काय म्हणाले नितीश कुमार...

पक्षाचे माजी अध्यक्ष शरद यादव यांच्याबाबत पत्रकारांनी विचारताच, शरद यादव यांना कोणताही निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य असल्याचे नितीश कुमार म्हणाले.

Aug 12, 2017, 06:27 PM IST

नितीश कुमार आणि अमित शाह यांची भेट

नितीश कुमार आणि अमित शाह यांची भेट

Aug 12, 2017, 05:13 PM IST