munnabhai 3

मुन्नाभाई - ३ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सिने दिग्ददर्शक राजकुमार हिरानी यांनी मुन्नाभाई सीरीजचा तिसरा सिनेमा 'मुन्नाभाई ३' बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या सिनेमात संजय दत्त आणि अरशद वारसी हे मुख्य भूमिकेत असणार आहे. हिरानी सध्या रणबीर कपूरसोबत संजय दत्तच्या बायोपिकवर काम करत आहे. या सिनेमाची शूटिंग जूनपर्यंत संपणार आहे. हा सिनेमा ख्रिसमसच्या दिवशी रिलीज होणार असल्याचं बोललं जातंय. 

Feb 7, 2017, 11:28 AM IST

संजूबाब जेलमधून बाहेर, 'मुन्नाभाई-३' सेटवर!

प्रोड्युसर विधू विनोद चोपडा हे संजय दत्तला घेऊन 'मुन्नाभाई - ३' बनवण्यात अजूनही गंभीर आहेत. सध्या संजूबाबा पुण्याच्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असल्यामुळे त्यांचा हा प्रोजेक्ट रखडलाय... संजय दत्त सुटल्यानंतर का होईना, पण त्याच्याबरोबरच हा सिनेमा बनवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. 

Dec 13, 2014, 12:19 PM IST