भारतीय जवानांना मिळणार आधुनिक हेल्मेट
भारतीय लष्कराने आपल्या जवानांना आधुनिक हेल्मेट देण्याचा निर्णय घेतला आहे. लष्करी जवानांच्या सुरक्षेसाठी चिलखत उत्पादन करणाऱ्या कानपूर येथील एमकेयू इंडस्ट्रीजला 1.58 लाख नवी हेल्मेट बनवण्याचे कंत्राट देण्यात आलं आहे. हे नवीन हेल्मेट 9 मिलीमीटरच्या गोळीचा मारा सहन करू शकेल अशा पद्धतीने ते तयार करण्यात आलं आहे.
Jan 18, 2017, 11:46 PM IST