mns leader vasant maharashtra politics news

Vasant More : मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला ठार मारण्याची धमकी

Vasant More : मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे याला ठार मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रुपेश याला सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी पुढील तपासाला सुरूवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे जवळचे नेते म्हणून वसंत मोरे यांची ओळख आहे.

Mar 7, 2023, 12:14 PM IST