Vasant More : मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला ठार मारण्याची धमकी

Vasant More : मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे याला ठार मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रुपेश याला सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी पुढील तपासाला सुरूवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे जवळचे नेते म्हणून वसंत मोरे यांची ओळख आहे.

Updated: Mar 7, 2023, 03:14 PM IST
Vasant More : मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला ठार मारण्याची धमकी title=
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत वसंत मोरे आणि त्यांचा मुलगा रुपेश

Vasant More : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे जवळचे आणि पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे ( MNS Leader Vasant More) यांच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. (Pune Crime News)  वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून 30 लाख रुपयांची खंडणी अज्ञातांनी मागितली आहे. (Pune Crime News) खंडणी दिली नाही तर ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. (Pune Political News) याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  (Death threat to son of MNS leader Vasant More in Pune)  रुपेशला धकमी देताना म्हटले आहे की, ‘सावध राहा रुपेश. हा प्रकार गंभीर असल्याने वसंत मोरे आणि रुपेश मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलिसांत धाव घेतली. या धकमीनंतर तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.

पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे याला ठार मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रुपेश याला सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी पुढील तपासाला सुरूवात केली आहे. धमकी देणाऱ्यांने बनावट विवाह प्रमाणपत्र बनवून 30 लाखांची खंडणी मागितली आहे.  ही खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत आमच्याकडे तक्रार आल्याचे पोलिसांनी सांगितले. धमकीप्रकरणी तपास सुरु असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. 

 समाज माध्यम Whats Appवर एका मेसेजच्या माध्यमातून वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश याला ही धमकी देण्यात आली आहे. या मेसेजमध्ये रुपेश याच्या लग्नाचे बनावट प्रमाणपत्र बनविण्यात आले आहे. याच्यामाध्यमातून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न होता. जर खंडणी न मिळाल्यास लग्नाचे हे प्रमाणपत्र व्हायरल करीन तसेच, गोळी झाडून हत्या करीन, अशी धमकी देण्यात आली आहे, अशी तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे. 

दरम्यान, रुपेश मोरे याला कोणी धमकी दिले आहे, त्याचे नाव समोर आलेले नाही.   परंतु, वसंत मोरे यांनी याप्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. हा संपूर्ण प्रकार सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस तपास सुरु केला आहे.